डिचोली: हिंदुत्व हे केवळ धर्माधिष्ठित नाही, तर ते राष्ट्रनिष्ठाधिष्ठित आहे. केवळ कर्मकांड म्हणून देवळात जाऊन घंटा बडवणारा हिंदू आम्हाला नको आहेत, तर देश आणि धर्मासाठी त्याग करणारा हिंदू हवा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख रमेश नाईक यांनी केले.
धर्मवीर संभाजी महाराज यांच्या वढू-बुद्रुक (पुणे) येथील समाधी स्थळावरून आलेल्या ‘धर्मवीर ज्वाला’ ज्योतीचे स्वागत केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे धारकरी मंगेश पाटील यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या वाट्याला आलेल्या यातनांचे कथन केले. जयेश नाईक यांनीही मार्गदर्शन केले. ‘धर्मवीर ज्वाला’ ज्योतीचे डिचोलीत आगमन होताच जयघोष करण्यात आला. यावेळी मंदार गावडे, विनायक मुंगरे, संदेश सराफ, पापूराज मयेकर, गोविंद साखळकर, सूर्यकांत देसाई, शैलेश फातर्पेकर, शुभलता कळंगुटकर, रामचंद्र पळ, विजय होबळे, नारायण बेतकीकर उपस्थित होते.
संभाजीराजे बलिदान मासानिमित्त उपक्रम
संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवप्रतिष्ठानतर्फे पाळण्यात येणाऱ्या बलिदान मासानिमित्त ‘धर्मवीर ज्वाला’ ज्योत सर्वत्र फिरवण्यात येत आहे. धारकरी मंगेश पाटील आणि सहकारी धारकरी ही ज्वाला ज्योत घेऊन फिरत आहेत. साखळीमार्गे बेळगावहून ज्योत डिचोली शहरात येताच जुन्या बस स्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ‘धर्मवीर ज्वाला’चे स्वागत करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.