Panjim  Dainik Gomantak
गोवा

G-20 Summit Goa 2023 शिखर बैठकीची जय्यत तयारी

शिष्टमंडळ दाखल : वाहतूक, निवास व्यवस्थेचा घेतला आढावा

गोमन्तक डिजिटल टीम

G-20 Summit Goa 2023 येत्या सोमवारपासून गोव्यात सुरू होणाऱ्या जी-20 शिखर बैठकीसाठी सरकारने जय्यत तयारी केली आहे.

या बैठकीसाठी येणारे पाहुणे व निमंत्रितांसाठी सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, आरोग्य, निवास तसेच बैठकांच्या ठिकाणी केलेल्या आयोजनाच्या तयारीसाठी आज दिवसभर बैठका सुरू होत्या. या निमंत्रितांचे शिष्टमंडळ आज रात्री उशिरा गोव्यात येण्यास सुरुवात झाली.

ही शिखर बैठक ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये होत असल्याने तेथील कर्मचाऱ्यांना बैठकीच्या व्यवस्थेची संपूर्ण माहिती देण्यात आली. तसेच निमंत्रितांच्या सर्व व्यवस्थेसंदर्भात आढावा घेण्यात आला.

निमंत्रित व अधिकाऱ्यांच्या हॉटेलमध्ये कशाप्रकारे हालचाली असतील तसेच जेवणाची व्यवस्था याकडेही बारकाईने लक्ष देण्यात येत आहे.

आग्वाद किल्ल्यावर या निमंत्रितांसाठी रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे त्यांची वाहतूक तसेच सुरक्षेचाही आढावा घेण्यात आला.

बांबोळी येथील ग्रॅण्ड हयातकडे जाण्यासाठी निमंत्रितांसाठी दाबोळी विमानतळावर जी-20 ब्रँडेड दोन ईव्ही बसेस व तीन ऑडी कार तैनात केल्या आहेत.

आरोग्य संचालनालयातर्फे कोविड चाचणी तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या ठिकाणी कोविड चाचणीसाठी डॉक्टरांचे पथक नेमले आहे. व्यवस्थेचा आढावा घेण्याबरोबरच त्याची रंगीत तालीमही घेण्यात आली.

अटल सेतूचे काम अजून पूर्ण न झाल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलिस खात्याने निमंत्रितांना जलमार्गाने आग्वाद किल्ल्यावर नेण्याची विनंती केली आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

हा सेतू सोमवारपूर्वी खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाहुण्यांना रस्तामार्गे नेताना सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा लागणार आहे. संध्याकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पर्यायासाठी वाहतूक पोलिसांनी नियोजन केले आहे.

बॅरिकेड्सवरील कॅसिनोच्या जाहिराती झाकल्या

जी-20 शिखर बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर राजधानी पणजीतील रस्‍त्यांवर असलेल्या बॅरिकेड्सवरील कॅसिनोंच्या जाहिरातींमुळे गोव्याची प्रतिमा मलीन होऊ नये, यासाठी हे बॅरिकेड्स बॅनरच्या कापडाने झाकले आहेत.

ज्या रस्त्यांवरून निमंत्रितांच्या वाहनांचा ताफा जाणार आहे, तेथील कॅसिनोचे फलक झाकण्याचे काम शुक्रवारी सुरू होते.

या बैठकीत गोवा हे पुरातन वारसा जपणारे पर्यावरणीय राज्य असल्याचे भासवण्याचा आटोकाट प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.

विमानतळांवर कोरोना चाचण्‍या

जी-20 शिखर परिषदेची पहिली बैठक 17 ते 19 एप्रिलदरम्‍यान राजधानी पणजीत होत आहे. त्‍या पार्श्वभूमीवर जगभरातून दाखल होणाऱ्या अतिमहनीय व्‍यक्‍तींसाठी दाबोळी व मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध केली आहे.

ज्‍यांना लक्षणे आहेत, अशा व्‍यक्‍ती चाचणी करून घेऊ शकतात. अर्थात चाचण्‍या ऐच्‍छिक आहेत, अशी माहिती आरोग्‍य खात्‍याकडून देण्‍यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT