Goa Police गोव्यात वास्तव्य केलेल्या परप्रांतीय भाडेकरूंची पडताळणी करण्याची मोहीम गोवा पोलिसांनी हाती घेतली असून मागच्या तीन महिन्यांत दक्षिण गोव्यातील 14 पोलिस स्थानकांच्या क्षेत्रात 8911 भाडेकरूंची पडताळणी करण्यात आली.
दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, फोंडा आणि कोलवा पोलिस स्थानकाच्या कक्षेत सर्वाधिक भाडेकरूंची संख्या आढळून आली असून फोंडा येथे 1395 तर कोलवा येथे 1192 भाडेकरू आढळून आले आहेत.
फोंडा येथे कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांची वस्ती जास्त असून कोलवा भागात मच्छीमारी आणि पर्यटन उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची वस्ती अधिक आहे.
व्यावसायिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे असलेल्या कुंकळ्ळी (946), वास्को (839), मडगाव (789), कुडचडे (700), वेर्णा (696 आणि मुरगावमध्ये (517 भाडेकरूंची नोंद झाली.
त्यामानाने फातोर्डा (421), काणकोण (367), मायणा - कुडतरी (349), सांगे (284), केपे (236) येथे कमी भाडेकरूंची नोंद झाली.
कुळे पोलिस स्थानकाच्या कक्षेत सर्वांत कमी म्हणजे 180 भाडेकरूंची नोंद झाली आहे. घरातील भाडेकरूंची नोंद जवळच्या पोलिस स्थानकात करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
..तरीही बेपर्वाई
आपल्या घरातील भाडेकरूंची माहिती पोलिस स्थानकात न देणाऱ्या मालकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तरीही घरमालक याबाबत गाफील राहिले आहेत.
ज्यांनी आपल्या घरात भाडेकरू ठेवले आहेत, त्यांची स्थानिक पोलिसांत नोंद करणे आवश्यक असून अशी नोंद न करणाऱ्या घरमालकांवर फौजदारी कारवाई केली जाऊ शकते.
- अभिषेक धनिया, पोलिस अधीक्षक, दक्षिण गोवा.
पोलिसांनी भाडेकरू पडताळणी मोहीम तीव्र केली असून, शुक्रवारी म्हापसा पोलिसांनी वेर्ला, काणका व पर्रा या परिसरात 30 पेक्षा अधिक बिगर गोमंतकीयांना अटक केली.
पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी, पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील पाटील यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह वेर्ला-काणका व पर्रा येथे कोम्बिंग ऑपरेशन राबविले.
यावेळी 30 पेक्षा अधिक लोकांजवळ कुठलेही दस्तऐवज किंवा पोलिस कार्ड नव्हते. अटक केलेल्यांमध्ये कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेशातील कामगारांचा समावेश होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.