South Goa Dainik Gomantak
गोवा

South Goa : दुहेरी रेल्वे मार्गाचा विषय काँग्रेसचे दोन्ही खासदार लोकसभेत मांडतील! एलिना साल्ढाणा

South Goa : काँग्रेसमध्ये घेतला प्रवेश; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी त्यांचे स्वागत केले.

गोमन्तक डिजिटल टीम

South Goa :

पणजी, दक्षिण गोव्यातील रेल्वेच्या दुहेरी मार्गाला लोकांचा विरोध आहे. निवडून आल्यानंतर काँग्रेसचे दोन्ही खासदार रेल्वे दुपदरीकरणाचा विषय लोकसभेत निश्‍चित मांडतील, असा विश्‍वास कुठ्ठाळीच्या माजी आमदार एलिना साल्ढाणा यांनी व्यक्त केला.

भाजप सरकारात मंत्री राहिलेल्या तथा आम आदमी पक्षाची सोडचिट्टी दिलेल्या एलिना यांनी शनिवारी सायंकाळी आपल्या समर्थकांसमवेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी त्यांचे स्वागत केले.

एलिना म्हणाल्या, आपला हा पक्षप्रवेश काही ठरवून केलेला नाही. सकाळी प्रवेशाविषयी ध्यानीमनी काहीही नव्हते. परंतु काँग्रेसने दोन्ही उमेदवार जाहीर केल्यानंतर आपणास आनंद झाला. त्यानंतरच आपण काँग्रेस पक्षप्रवेश करण्याचे निश्‍चित केले.

आपले माहेर म्हापसा असल्याने माजी मंत्री तथा उत्तर गोव्याचे उमेदवार रमाकांत खलप हे आपले शेजारी राहिले आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून केलेले कामही सर्वांच्या लक्षात आहे.

दक्षिण गोव्यातून उमेदवारी मिळालेल्या विरियातो फर्नांडिस हे सतत विविध विषयावर आवाज उठवीत आले आहेत. दोन्ही उमेदवारांना गोव्यातील प्रश्नांची चांगल्या रितीने जाण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT