Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

Boeing 737 MAX Software Issue: बोइंगच्या काही बी ७३७ मॅक्स विमानांमध्ये सॉफ्टवेअरशी संबंधित समस्या आढळल्या आहेत.
Boeing 737 MAX Software Issue
Boeing 737 MAX Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली: बोइंगच्या काही बी ७३७ मॅक्स विमानांमध्ये सॉफ्टवेअरशी संबंधित समस्या आढळल्या आहेत. त्यामुळे, विमान उतरताना लॅंडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर विमानातील स्वयंचलित मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता या समस्येमुळे निर्माण होऊ शकते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी विमान कंपनीकडून काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भारतात एअर इंडिया एक्सप्रेस व अकासा एअर या कंपन्यांकडून ९६ बोइंग मॅक्स विमाने चालविली जातात. बोइंग कंपनीचे अभियंते सॉफ्टवेअर अपडेट करण्यावर काम करत आहेत. गेल्या महिन्यात आम्ही या विमानाची सेवा घेणाऱ्या सर्व कंपन्यांना सॉफ्टवेअरच्या या समस्येबद्दल माहिती दिली होती.

Boeing 737 MAX Software Issue
Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

वैमानिकांना विमानाच्या लॅंडिगच्या वेळी या समस्येमुळे स्वयंचलित मार्गदर्शन प्रणालीच्या कार्यक्षमतेत घट जाणवू शकते. अशा परिस्थितीचा सुरक्षितपणे सामना करण्यासाठी वैमानिकांनी आधीपासून अंमलबजावणी केल्या जाणाऱ्या प्रक्रियेची सविस्तर माहिती संबंधित कंपन्यांना देण्यात आली, असे बोइंगच्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, या समस्येबाबत आम्ही बोइंगच्या संपर्कात असून विमानांच्या उड्डाणांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. आम्ही निर्धारित प्रक्रिया आणि नियमांचे पालन करत आहोत, असे अकासा एअर या कंपनीने स्पष्ट केले. मात्र, आपल्याकडील कोणत्या बोइंग ७३७ मॅक्स विमानाला अशी समस्या आली का, हे कंपनीने सांगितले नाही.

Boeing 737 MAX Software Issue
Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com