Subhash Phaldesai  Dainik Gomantak
गोवा

Subhash Phaldesai: 40 हजार व्यावसायिकांना मिळणार भरपाई

खात्याकडे आलेल्या अर्जांपैकी पुढील पंधरा दिवसांत 40 हजार अर्ज निकालात काढण्यात येतील, अशी माहिती समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

Subhash Phaldesai: राज्यात कोविड काळात लॉकडाऊनमुळे ज्या लघु पारंपरिक व्यावसायिकांना फटका बसला, त्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये भरपाई देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत 20 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

या मदतीसाठी खात्याकडे आलेल्या अर्जांपैकी पुढील पंधरा दिवसांत 40 हजार अर्ज निकालात काढण्यात येतील, अशी माहिती समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

कोविड काळात लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे लहान व्यावसायिक तसेच विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये भाजी विक्रेते, खाजेकार, गाडेवाले, चणेकार, यांचा समावेश होता.

अनेक ठिकाणी त्या काळात जत्रा व फेस्तही रद्द केल्याने या व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे राज्य सरकारने या व्यावसायिकांना मदतीचा आधार म्हणून ही प्रत्येकी 5 हजार रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता.

या भरपाईसाठी पात्र असलेल्या अर्जदारांवर अन्याय होणार नाही, असे फळदेसाई यांनी सांगितले. या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील इतर विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

समाजकल्याण खात्याकडे सुमारे 90 हजार अर्ज आले आहेत. त्यातील 40 हजार अर्ज पहिल्या टप्प्यात निकाली काढण्यात येतील. उर्वरित अर्ज एप्रिलपर्यंत निकालात काढले जातील.

त्यासाठी अर्थसंकल्पात आणखी किमान 25 कोटींची तरतूद करावी लागणार आहे. यापुढे नव्याने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. ज्यांनी अर्ज केले आहेत, त्यांनाच मदत दिली जाईल, असे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT