Dr. Deviya Rane Dainik Gomantak
गोवा

Sattari News : शैक्षणिक उपक्रमांमधून प्रगती साधावी : डॉ. दिव्या राणे

केरी रॉयल स्पोर्ट्‌स ॲण्ड कल्चरल क्लबचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

दैनिक गोमन्तक डिजिटल

गावच्या विकासासाठी सामाजिक संस्थांची गरज आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणात जादा लक्ष केंद्रित करावे. तसेच शैक्षणिक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी आपली प्रगती साधावी, असे प्रतिपादन आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केले. केरी-बाहेरीलवाड्याबद्दल राणे कुटुंबीयांना सदैव आपुलकी राहील व केरी परिसरात आपण विकास प्रकल्प आणण्यास कटिबद्ध असल्याचे राणे यांनी सांगितले.

केरी-बाहेरीलवाडा येथील रॉयल स्पोर्ट्‌स ॲण्ड कल्चरल क्लबचा २३वा वर्धापनदिन श्री हनुमान मंदिराच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून पर्ये मतदारसंघाच्या आमदार तथा गोवा वनविकास महामंडळाच्या चेअरमन डॉ. दिव्या राणे उपस्थित होत्या.

यावेळी व्यासपीठावर अबकारी आयुक्त नारायण गाड, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे उपसरव्यवस्थापक मार्केटिंग तथा श्री हनुमान मंदिराचे अध्यक्ष दीपक नार्वेकर, जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, केरीच्या सरपंच दिक्षा गावस, क्लबचे अध्यक्ष गिरीश गावस, सर्व पंचसदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन गजानन शेट्ये यांनी केले व त्यांनीच आभार मानले. यावेळी दिव्या राणे यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. त्यानंतर मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले व रात्री स्थानिक युवकांतर्फे दशावतारी नाटक सादर करण्यात आले.

नवनवीन संधी शोधा!

गोव्याचे अबकारी आयुक्त नारायण गाड यांनी मुलांना मार्गदर्शन करताना नवनवीन संधी शोधण्याचे आवाहन केले. स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळविण्यासाठी चांगली तयारी करावी तसेच राज्यस्तरावर उच्च पदांसाठी आपल्या ज्ञानात भर घालावी व संवाद कौशल्यावर भर द्यावा असे आवाहन केले.

"मुलांनी नवीन शैक्षणिक प्रवाहात सामील झाले पाहिजे. आतापासून त्यांनी शिक्षणातील नवीन क्षेत्रे निवडली तर त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. केरी गाव हा सदैव सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात चर्चेत राहिलेला आहे. बाहेरील वाड्यावरील एकता सर्वांनी अबाधीत ठेवावी. तसेच गुरुजनांनी दिलेले शिक्षण व संस्कारांचा गावाच्या विकासासाठी वापर करावा."

दिपक नार्वेकर, उपसरव्यस्थापक, गोवा पर्यटन महामंडळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Israel-Hamas War: क्रीडाविश्वात खळबळ, इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू

Mopa Airport: उबर अ‍ॅपद्वारे भाडे घेणाऱ्या 4 जणांवर वाहतूक विभागाची कारवाई

Bicholim: डिचोलीत दोन विद्यार्थ्यांमध्ये मारामारी, व्हॉट्सअप ग्रुपवर चॅटिंग करताना झाला होता वाद, एकास अटक

Panjim: "गोव्यातील कलाकारांनाही मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी द्यावी", CM सावंतांचे प्रतिपादन

वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या जमिनीचा वाद, सरकारने हस्तक्षेप करावा; पालकांची मागणी

SCROLL FOR NEXT