Zuari Bridge : नवा झुवारी पूल ऑगस्टपर्यंत : अतुल जोशी

53 पैकी 38 भागांचे काम पूर्ण, एकूण 224 केबल्स
Zuari Bridge
Zuari BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

सध्या काम सुरू असलेला झुवारी केबल स्टेड पूल येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती दिलीप बिल्डकॉन कंपनीचे उपनिर्देशक अतुल जोशी यांनी दिली. हा झुवारी पूल पणजीहून मडगावला जाणाऱ्या वाहनांसाठी खुला होईल तर सध्याचा नवीन पुल हा फक्त दक्षिण गोव्यातून येणाऱ्या गाड्या उत्तर गोव्यात जाण्यासाठी वापरला जाईल.

जोशी पुढे म्हणाले, आता पुलाचे काम जलदगतीने सुरू आहे. पहिल्या केबल स्टेड पुलाचे काम सुरू असताना फार अडचणी आल्या. त्यात कोरोना महामारीमुळे बांधकाम सामग्री जी बाहेरील देशातून आणावी लागायची ती बंद झाली. त्यामुळे पुलाचे काम लांबणीवर पडले. नंतर ते सुरळीत पार पडले आणि एक केबल स्टेड पूल कार्यान्वित झाला.

Zuari Bridge
साखळी, फोंडा पालिकेवर भाजपचा झेंडा; CM सावंत, प्रदेशाध्यक्ष तानावडेंनी मानले मतदारांचे आभार

जोशी पुढे म्हणाले, नवीन केबल पुलाचे बांधकाम सुरू असताना वाहतूक कोंडीचा फार त्रास व्हायचा. पुलासाठी लागणारे साहित्य नेणारे ट्रकसुद्धा कितीदा वाहतूक कोंडीत खोळंबून राहायचे. पण आता नवीन पुलामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्नच मिटला आहे.

जेव्हा दुसरा झुवारी केबल स्टेड पूल पूर्ण होईल, तेव्हा उत्तर गोव्याहून दक्षिण गोव्याला जाणारे लोक सुरळीतपणे वाहतूक कोंडीशिवाय प्रवास करू शकतील. संपूर्ण पुलाला २२४ केबल्स असणार आहेत.

प्रकल्पासाठी 550 कोटी

नव्या झुवारी पुलाच्या सध्याच्या प्रगतीविषयी विचारले असता जोशी म्हणाले, या पुलाला 53 सेग्मेंट्स आहेत. त्यातले 38 सेग्मेंट्स रविवारपर्यंत घालून पूर्ण होतील. पुलाचे काम हे गणेश चतुर्थीपूर्वी पूर्ण होऊ शकते. बांधकामासाठी लागणारे सामान आणून ठेवलेले आहे. या सगळ्या प्रकल्पाचा खर्च जेमतेम 550 कोटी रुपये एवढा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com