Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : धेंपे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतली लेखकांची भेट; साहित्यिक प्रवासाविषयी चर्चा

Panaji News : रामनाथ गावडे व विन्सी क्वाद्रूस यांच्याशी संवाद

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, भारतीय भाषा विभाग, धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालय, गोवा कोकणी अकादमी आणि दाल्गाद कोंकणी अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘विद्यार्थी लेखकाचे भेटेक’ या कार्यक्रमात कोकणीतले प्रसिद्ध कथाकार रामनाथ गावडे आणि विन्सी क्वाद्रूस यांची विद्यार्थ्यांनी भेट घेतली.

दाल्गाद कोकणी अकादमीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. उद्घाटन सत्राला दाल्गाद कोकणी अकादमीचे अध्यक्ष सॅल्सो फर्नांडिस, कथाकार रामनाथ गावडे, विन्सी क्वाद्रूस तसेच भारतीय भाषा विभाग प्रमुख अंजू साखरदांडे यांची उपस्थिती होती.

अंजू साखरदांडे यांनी स्वागत केले व या कार्यक्रमामागील हेतू व उद्देश त्यांनी स्पष्ट केला. सॅल्सो फर्नांडिस यांनी दाल्गाद कोकणी अकादमीच्या कार्यावर प्रकाश टाकला. विद्यार्थिनी मैथिली प्रभुदेसाई हिने मान्यवरांचा परिचय करून दिला.

कथाकार रामनाथ गावडे व विन्सी क्वाद्रूस यांनी त्यांच्या साहित्यिक प्रवासाविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा केली.

सिद्धी मोरजकर, तनिमा पार्सेकर, ओंकार नाईक, रोहिणी मुरगावकर आणि गायत्री नाईक यांनी लेखकांना प्रश्न विचारले. या कार्यक्रमाला सुमारे ५० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय भाषा विभागाचे सहायक प्राध्यापक गौरांग भांडीये यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धेंपे महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. वृंदा बोरकर यांनी मार्गदर्शन लाभले.

अनुभवाने कथाकार झालो : गावडे

लहान वयात कथा लिहिणे आणि वाचणे यामुळे मला अनेक अनुभव आले. अनुभवाने कथा आकार घेऊ लागल्या. अनेक कथा लिहिल्या गेल्या, पण पुस्तक प्रकाशित करण्याचा विचार पक्का झाल्यावर कथा निवडणे अवघड झाले. कधी मी कथा लिहिल्या तर कधी कथेने स्वतःला माझ्याकडून लिहून घेतले, असे रामनाथ गावडे यांनी सांगितले.

कथेच्या क्षेत्रात सातत्य महत्त्वाचे : क्वाद्रूस

विन्सी क्वाद्रूस म्हणाले की, अनुभवांमुळे कथा समृद्ध होते. लहानपणापासूनचे साहित्याचे वाचन झाल्याने फार आधार झाला. रोमन तसेच देवनागरी भाषेत लिहिल्याने कथेसाठी चांगले वाचक मिळाले. आजच्या मुलांनी कथा लिहिल्या पाहिजेत आणि लिहीत राहिल्या पाहिजेत. कथेच्या क्षेत्रात सातत्य महत्त्वाचे असते. तेव्हाच कथा आणि कथाकार समृद्ध होतात, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT