Government rules on school bags Dainik Gomantak
गोवा

School Bag Weight: ..विद्यार्थ्यांचा खांद्यावर दप्तराचे 'वाढते' ओझे! केंद्राच्‍या निर्णयाकडे गोव्याची पाठ; परिपत्रकाला ‘केराची टोपली’

School bag weight policy: शालेय विद्यार्थ्यांच्या दप्‍तराच्‍या ओझ्‍याबाबत शिक्षण मंत्रालयाने २०२० मध्‍ये धोरण तयार केले असले, तरी राज्‍यात दरवर्षी या धोरणाची पायमल्‍ली होताना स्‍पष्‍टपणे दिसून येत आहे.

Sameer Panditrao

पणजी: शालेय विद्यार्थ्यांच्या दप्‍तराच्‍या ओझ्‍याबाबत शिक्षण मंत्रालयाने २०२० मध्‍ये धोरण तयार केले असले, तरी राज्‍यात दरवर्षी या धोरणाची पायमल्‍ली होताना स्‍पष्‍टपणे दिसून येत आहे. शिक्षण खाते दरवर्षी याबाबत परिपत्रक काढत असले, तरी शिक्षण संस्‍थांकडून या परिपत्रकाला ‘केराचीच टोपली’ दाखवली जात आहे.

‘स्‍कूल बॅग धोरण-२०२०’मध्‍ये शालेय विद्यार्थ्यांच्‍या दप्‍तराचे ओझे त्‍यांच्‍या वजनाच्‍या दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त असू नये, असा नियम आहे. परंतु राज्‍यातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांच्‍या पाठीवर त्‍यांच्‍या वजनापेक्षा जास्‍त वजनाचे दप्‍तर पाहायला मिळते. यासंदर्भात काही विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता, वर्गशिक्षकांकडून दरदिवशीचे वेळापत्रक मिळते.

परंतु, वर्गात कधीही कोणताही विषय शिकवला जाऊ शकतो. त्‍यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वच विषयांची पुस्‍तके व वह्या आणण्‍याच्‍या सूचना शिक्षकांकडून देण्‍यात येतात. त्‍यामुळे दररोज सर्वच विषयांची पुस्‍तके, वह्या घेऊन जाव्‍या लागतात, अशी प्रतिक्रिया त्‍यांनी दिली. दप्‍तरात पुस्‍तके, वह्या यांसोबतच पाण्‍याची बाटली, जेवणाचा डबा हे साहित्‍यही असते. त्‍यामुळे विद्यार्थ्यांच्‍या दप्‍तराचे ओझे अधिक भरत असल्‍याचे पालकांनी सांगितले.

दप्‍तराचे वजन जास्त नसावे!

दप्‍तराच्‍या वाढत्‍या वजनामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्‍ये मान, कंबरदुखीच्‍या आजारांत वाढ झाल्‍याचे चित्र काही वर्षांपूर्वी विविध राज्‍यांमधून समोर आले होते. त्‍यामुळेच केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्‍या वजनाच्‍या दहा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक वजन त्‍यांच्‍या दप्‍तराचे नसावे, अशी अट राज्‍यांना घातली होती.

अंमलबजावणी व्‍हावी!

शिक्षण मंत्रालयाच्‍या आदेशानुसार दप्‍तराच्‍या ओझ्‍याबाबत शिक्षण खाते दरवर्षी परिपत्रक जारी करीत असते. या परिपत्रकातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे शिक्षण संस्‍थांची जबाबदारी असते, अशी प्रतिक्रिया शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT