Goa School: स्कूल चले हम..! शाळा न पाहिलेली 5 मुले चढणार हायस्कूलची पायरी; गोव्यातील मजूर कुटुंबांच्या चेहऱ्यावर हसू

Kadamb Plateau students: ही कहाणी आहे कदंब पठारावरील. गेल्या १० वर्षांत तेथे अनेक बंगले, इमारती उभ्या राहिल्या. भाकरीचा चंद्र शोधत देशभरातील अनेक मजूर कुटुंबे तेथे आली. महिला घरात धुणीभांडी करू लागल्या.
Goa School News, Goa Education News
Goa Education NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: घराण्यात कोणी शाळेचे तोंड देखील पाहिलेले नाही. वडील पोटाची खळगी भरण्यासाठी गोव्यात आले आणि मिळेल ती कामे करू लागले. अशा परिस्थितीत कदंब पठारावर वाढणाऱ्या पाच बालकांना चक्क हायस्कूलची पायरी चढण्याची संधी मिळाली आहे.

ही कहाणी आहे कदंब पठारावरील. गेल्या १० वर्षांत तेथे अनेक बंगले, इमारती उभ्या राहिल्या. भाकरीचा चंद्र शोधत देशभरातील अनेक मजूर कुटुंबे तेथे आली. महिला घरात धुणीभांडी करू लागल्या, तर पुरुष अंगमेहनतीची मिळेल ती कामे करू लागली. मुलांना शाळेत पाठवायचे असते, हे त्यांच्या गावीच नव्हते. कारण घरात कोणीत कधी शिकलेला नव्हता.

‘चिल्ड्रन्स राईट्स इन गोवा’ या बिगर सरकारी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ही मुले हेरली. वर्षभर त्यांना अक्षर ओळख करून देण्यासाठी मेहनत घेतली. या मुलांचे जन्मदाखले नव्हते. पालकांकडेही आवश्यक त्या कागदपत्रांचा अभाव. अशा समस्यांना तोंड देत प्रतिज्ञापत्रे सादर करून या मुलांना शाळेत पाठवण्याची तयारी केली.

मात्र, त्यांचे वय हे हायस्कूलमध्ये जाण्याचे झाले होते. त्यामुळे हायस्कूलमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केला आणि त्याला यश आले. खोर्ली (तिसवाडी) येथील सुनंदाबाई बांदोडकर हायस्कूलमध्ये आता ती पाच मुले भवितव्य घडवणार आहेत. ही केवळ शाळा प्रवेशाची घटना नसून, कष्टकरी कुटुंबांमधील पिढ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी एक आश्वासक सुरुवात आहे.

Goa School News, Goa Education News
Goa Schools Exams: शालेय परीक्षांबाबत मोठी अपडेट! 2 सत्रांमध्ये होणार आयोजन; प्रश्‍नपत्रिका, वेळापत्रक ‘जीएसईआरटी’द्वारे

‘चिल्ड्रन्स राईट्स इन गोवा’चे परिश्रम

या भागातील अनेक मजूर कुटुंबांना शिक्षणाचे महत्त्व सांगणे, हेच पहिले आव्हान होते. ‘चिल्ड्रन्स राईट्स इन गोवा’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन पालकांशी एक ते एक संवाद साधला. ‘मुलं शिकलीच पाहिजेत’ ही भावना रुजवण्यासाठी अपार मेहनत घेतली.

Goa School News, Goa Education News
Valpoi School Roof leak:छपराची दुरुस्ती रखडली, विद्यार्थ्यांना भर पावसात शिकण्याची वेळ; गुंडेलवाडा - वेळुस सरकारी प्राथमिक शाळेची दुरावस्था; Video

कागदपत्रांच्या अडथळ्यावर मात

संस्थेच्या कार्यकर्त्या नमिता नाईक आणि प्रब्जीत कौर यांनी याकामी पुढाकार घेतला. शाळेत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची कमतरता होती. प्रत्येक मुलासाठी स्वतंत्र प्रतिज्ञापत्र तयार केले. यामुळे प्रवेश प्रक्रियेतील अडथळे दूर होऊन मुले शाळेत जाऊ लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com