Election Commission Dainik Gomantak
गोवा

निवडणुकीसाठी कडक सुरक्षा योजना; निवडणूक अधिकारी कुणाल म्हणाले...

निवडणुकीदरम्यान कोणताही चुकीचा प्रकार किंवा गुन्हे घडू नयेत यासाठी आम्ही 81 फ्लाईंग स्कॉड त्याचबरोबर स्थानिक सर्व्हीलन्स टीम आणि गोवा पोलिस तैनात आहेत.

दैनिक गोमन्तक

Election Commission: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग सतर्क असून जय्यत तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. या संदर्भात निवडणूक अधिकारी कुणाल यांनी आयोगातर्फे (Election Commission) चालणाऱ्या सर्व तयारीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

पर्यावरणपूरक निवडणुकीचे साहित्य

ते म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीतील (Goa Elections 2022) सर्व साहित्य पर्यावरणपूरक वापरण्यावर आमचा भर आहे. मतदान अधिकाऱ्यांना लागणारे डस्टबिन, पेपरवेट, पेन-पेन्सिल सर्व काही पर्यावरणपूरक असणार आहे. आणि या वस्तू आम्ही स्थानिक एनजीओ तसेच गोवा हस्तकला महामंडळाकडून घेतल्या आहे. (Strict security plan for elections said election incharge kunal)

मताधिकारपासून वंचित लोकांना संधी

याआधीच्या निवडणुकीत तृतीयपंथी लोक आणि सेक्सवर्कर्स मतदान नोंदणी करत नव्हते. परंतु यावेळी आम्ही त्यांना मतदान करण्याचे आवाहन करून स्थानिक एनजीओच्या मदतीने त्यांची नोंदणी करण्यात आली असून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. यासाठी जिल्हा निवडणूक आयोग आणि मतदान नोंदणी अधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न केले आहेत. म्हणून या वर्गाने सुद्धा यंदाच्या निवडणुकीत मतदान करावे, असे मी त्यांना आवाहन करतो.

गुन्हे घडू नयेत यासाठी प्रशासन सतर्क

निवडणुकीदरम्यान कोणताही चुकीचा प्रकार किंवा गुन्हे घडू नयेत यासाठी आम्ही 81 फ्लाईंग स्कॉड त्याचबरोबर स्थानिक सर्व्हीलन्स टीम आणि गोवा पोलिस तैनात ठेवले आहेत. या संदर्भातील वर्कशॉप डिसेंबर महिन्यात पार पडले असून आमची टीम यासाठी कार्यरत आहे. दुसरीकडे ज्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत अशा लोकांच्या याद्या तयार करून आम्ही त्यांच्यावर कारवाई केली आहे. सर्व प्रकारचे गुन्हे नोंद असलेल्यांवर आमचे कडक लक्ष आहे. त्यामुळे ही निवडणूक शांततेत, कोणताही गैरप्रकार न होता पार पडावी यासाठी केंद्र सैनिक बल, गोवा पोलीस प्रशासन संपूर्णपणे सतर्क आहे.

या निवडणुकीसाठी आयोगाने एक अत्यंत चांगला उपक्रम राबवला आहे. Know Your Candidate (KYC) ॲपद्वारे तुम्ही तुमच्या उमेदवाराची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता आणि मगच मतदान करू शकता. त्याचबरोबर आयआयटी गोवासोबत तंत्रज्ञानाचा वापर करत 'इलेक्शन आय' अशी एक सिस्टीम तयार करून कम्प्युटर व्हिजन तंत्रज्ञानाद्वारे आम्ही हे पाहू शकतो की किती लोक मतदानावेळी आतमध्ये कितीजण उभे आहेत, आयोगातर्फे त्यांच्यावर नजर ठेवली जाईल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही मतदान केंद्रांवर योग्य ती सुविधा केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर हाऊ टू वोट (How To Vote) म्हणजेच मतदान कसे करावे? हे आम्ही घरोघरी जाऊन लोकांना सांगत आहोत. त्यामुळे या निवडणुकीत मी जनतेला आवाहन करतो की त्यांनी आपला मताधिकाराचा हक्क न चुकता बजावून सहकार्य करावे, असे मत मुख्य निवडणूक अधिकारी (Election Incharge) कुणाल यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

SCROLL FOR NEXT