पेडणे येथे तब्बल 10.77 लाखांचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त

पेडणे पोलिसांची बधडक कारवाई
Illegal liquor stocks worth Rs 10.77 lakh seized by pernem police in goa
Illegal liquor stocks worth Rs 10.77 lakh seized by pernem police in goaDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: गोवा विधानसभा निवडणुका अवघ्या काही तासांवर आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्बंधनुसार राज्यात 12 फेब्रुवारी पासून दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. यातच, पेडणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 10.77 लाखांची बेकायदेशीर दारू जप्त केली असून, हिलरॉक-तेरेखोल येथे हा छापा टाकण्यात आला आहे. निरीक्षक विक्रम नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली आहे.(Illegal liquor stocks worth Rs 10.77 lakh seized by pernem police in goa)

Illegal liquor stocks worth Rs 10.77 lakh seized by pernem police in goa
यंदाच्या निवडणुकीत होणार इतिहासाची पुनरावृत्ती: CM प्रमोद सावंत

आज दिवसभरात अनेक कारवाई करण्यात आल्या असून, कार्यकर्त्यांकडून वारंवार निर्बंधाचे उल्लंघन होताना दिसत आहे. दरम्यान काल रात्री स्थानिक मतदारांना पैसे वाटप करताना, शाहरुख उर्फ मोहम्मद तौफिक शेख या व्यक्तीला वास्को पोलिसांनी अटक केली आहे. हा युवक फकीर गल्ली, साईनगर वास्को (Vasco) येथील रहिवाशी असून, त्याच्याकडून 1 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

केपे मतदारसंघात कारवाई

तर, केपे मतदारसंघात शनिवारी रात्री काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. भाजपाचे (BJP) कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी केला असून यासंबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, अद्याप पोलिसांकडून याबाबत दुजोरा मिळू शकलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com