flights diverted Dainik Gomantak
गोवा

Goa Airport: कुर्सी की पेटी बांध लीजिए मौसम बिगड़ने वाला है! गोव्याला येणारी विमाने वळवली

Dabolim Airport: मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या वातावरणाचा विमानसेवेला फटका बसला. यामुळे दाबोळीवर उतरणारी दोन विमाने इतरत्र वळविण्यात आली आहेत.

Pramod Yadav

दाबोळी: गोव्याला मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. उत्तर गोव्यात म्हापसा, पेडण्यात मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे राज्यात अनेकांची तारांबळ उडाली, रस्त्यावर पाणी साचले तर अनेक ठिकाणी इमारतींना गळती लागल्याचे पाहायला मिळाले. या पावसाचा राज्यातील विमानसेवेला देखील फटका बसला असून, दाबोळीवर उतरणारी दोन विमाने वळविण्यात आली आहेत.

राज्यात उत्तर आणि दक्षिण जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. काही ठिकाणी किरकोळ पडझड देखील झाली. मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या वातावरणाचा विमानसेवेला फटका बसला. यामुळे दाबोळीवर उतरणारी दोन विमाने इतरत्र वळविण्यात आली आहेत.

मुंबईतून गोव्याला (दाबोळी विमानतळ) येणारे विमान कर्नाटकातील बेळगावला वळविण्यात आले. तर, पुण्यातून गेलेले दाबोळीवर उतरणारे विमान हैदराबादला वळविण्यात आले आल्याची माहिती विमानतळ संचालकांनी दिली आहे.

मान्सूनपूर्व झालेल्या मुसळधार पावसात खराब झालेल्या हवामानामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.

डिचोली, साखळी, वाळपई, पणजीत मुसळधार

डिचोली, साखळी, वाळपई आणि राजधानी पणजीत पावसाने जोरदार बॅटींग केली. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणवर पाणी वाहू लागल्याचे दिसून आले. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. तर, काही ठिकाणी झाड कोसळल्याची घटना उघडकीस आली.

राज्यात कुठे किती एम. एम. पावसाची नोंद झाली?

पेडणे- 161 mm

म्हापसा -157 mm

पणजी - 81 mm

मुरगाव - 75 mm

वाळपई - 43 mm

सांगे - 42 mm

केपे - 40 mm

फोंडा - 30 mm

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT