Goa Rain: रस्त्यावर साचले पाणी, इमारतीला गळती, वीज पुरवठा खंडित; गोव्यात पावसाने उडवली दाणादाण

Heavy Rain In Goa: नऊ महिन्यांपूर्वी घाईघाईत उ‌द्घाटन करण्यात आलेल्या काणकोण येथील रवींद्र भवनच्या निकृष्ट कामाचे पितळ या मान्सूनपूर्व पावसाने उघडे पाडले.
Rain Lashes Part Of Goa
Goa Rain UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात मागील दोन दिवसांपासून काही अंशी पावसाच्या सरी बरसत होत्या. परंतु मंगळवारी (२० मे) पहाटेपासून राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत असून अद्यापही रिपरिप सुरूच आहे. मागील दोन-तीन महिन्यांपासून उष्म्याने नागरिक हैराण झाले होते, त्यापासून दिलासा मिळाला आहे.

राज्यात काणकोणपासून पेडण्यापर्यंत सर्वत्र पावसाचे धुमशान सुरूच आहे. पडझडीचे वृत्त नसले तरी; काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. सकाळपासून झोडपत असलेल्या पावसाने लोकांची तारांबळ उडाली.

विविध किनाऱ्यांवर आलेल्या देशी पर्यटकांची तारांबळ उडाली. पणजीत स्मार्ट सिटीच्या कामावर परिणाम झाला, तर पर्वरीत चाललेल्या उड्डाणपुलाच्या कामाचाही बोजवारा उडाला. सकाळपासून काळे ढग पसरले असून आणि दमट वातावरण कायम आहे.

Rain Lashes Part Of Goa
Crime: सात महिन्यात 25 जणांशी लग्न, गब्बरलाही नाही सोडले; पैसे, दागिने घेऊन पसार, 23 वर्षीय अनुराधाचा अनेकांना गुलिगत धोका

लोकांना पावसामुळे छत्री, रेनकोट घालूनच घराबाहेर पडावे लागले. या पावसाच्या सरी उष्म्याने हैराण लोकांना आनंदाच्या ठरत आहेत, तसेच या पावसाचा जबर दणकाही सोसावा लागला आहे. राज्यातील अनेक भागात रस्त्यावर पाणी येणे, पाणी तुंबणे, गळती अशा अनेक घटना घडल्या.

मडगाव पालिकेला फटका

मडगाव पालिकेतही पावसामुळे स्टोअर रुम तसेच काही भागात गळती लागली. त्यामुळे काही फायली भिजल्याचे सांगण्यात आले.

लाईनमनने गमावला जीव

वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामासाठी होंडा-सत्तरी येथे वीज खांबावर चढलेल्या लाईनमन चंद्रु गावकर यांना विजेच्या धक्का बसल्याने जीव गमवावा लागला, तर जखमी झालेल्या सर्वेश गावकर यांना पुढील उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले.

Rain Lashes Part Of Goa
Heavy Rain In Goa: गोव्याला पावसाने झोडपले; आठवडाभर मुसळधारेचा इशारा, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

काणकोण रवींद्र भवनात गळती

नऊ महिन्यांपूर्वी घाईघाईत उ‌द्घाटन करण्यात आलेल्या काणकोण येथील रवींद्र भवनच्या निकृष्ट कामाचे पितळ या मान्सूनपूर्व पावसाने उघडे पाडले. जोरदार पावसामुळे वाचनालयात गळती लागली. परिणामी वाचनालयात पाणी साचले. वाचनालयातील पुस्तकांचेही या पावसामुळे नुकसान झाले.

मच्छिमारांना इशारा

राज्यात पुढील दोन दिवस अशाच प्रकारे विजांच्या कडकडाटासह ताशी ५० ते६० किमी वेगाने वारे वाहत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तवत ऑरेंज अलर्ट कायम ठेवला आहे. कोकण आणि गोवा किनारपट्टीवर मच्छिमारांनी प्रवेश करणे टाळावे, असे आवाहन करत सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com