President Draupadi Murmu Goa Visit:  Dainik Gomantak
गोवा

President Draupadi Murmu Goa Visit: ताफा थांबवून राष्ट्रपती रमल्या विद्यार्थ्यांमध्ये; साधेपणाने भारावले विद्यार्थी

विद्यार्थ्यांना वाटली चॉकलेट्स, फोंड्यातील कॉलेजला दिली अचानक भेट

Akshay Nirmale

President Draupadi Murmu Goa Visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गोव्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर होत्या आणि आज, गुरूवारी त्यांच्या दौऱ्याच्या अखेरचा दिवस होता. दरम्यान, आज गोव्यातील विविध कार्यक्रम आटोपून त्या निघत असताना फोंड्यात विद्यार्थ्यांना पाहून त्यांनी अचानक आपला ताफा थांबवला आणि त्या थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन मिसळल्या.

राष्ट्रपती मुर्मू यांनी फोंड्यातील जीव्हीएम कॉलेजला भेट दिली. त्यांनी कॅम्पसमध्ये थेट येत विद्यार्थ्यांशी बोलल्या. सुरवातीला काही विद्यार्थी त्यांच्याशी थेट बोलायला लाजत होते. पण नंतर पाठीमागून आलेल्या मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थी-विद्यार्थीनींना त्यांच्याजवळ बोलावून घेतले. यावेळी काही जणांनी फोटोही काढून घेतले.

भारताच्या राष्ट्रपतींचा ताफा थांबला असून त्या स्वतः विद्यार्थ्यांमध्ये मिसळत असल्याचे पाहून विद्यार्थीही भारावले. यावेळी विद्यार्थ्यांशी गप्पा मारत मुर्मू यांनी आपल्याकडील कॅडबरीज विद्यार्थ्यांना वाटल्या. विद्यार्थी-विद्यार्थिनी त्यानंतर प्रचंडी उत्साही झाले होते.

मुर्मू यांना भेटण्यासाठी विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडाली. त्यावेळी राष्ट्रपतींच्या सुरक्षारक्षकांचीही थोडी धावपळ उडाली.

पण, राष्ट्रपतींच्या या साधेपणाने विद्यार्थी प्रचंड भारावले. त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ सुरू होती. या वेळी राष्ट्रपती मुर्मू यांच्यासमवेत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT