Goa Taxi Association Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi Association : बेकायदा पर्यटक वाहतूक करणाऱ्या सिंधुदुर्गातील टेम्पो ट्रॅव्हल विरोधात कारवाई करा; गोवा टॅक्सी असोसिएशन

Goa Taxi Association: असोसिएशनचे सिद्धेश धारगळकर यांनी सांगितले की, मळगाव, सिंधुदुर्ग येथील एक टेम्पो ट्रॅव्हल व्यावसायिक गोव्यात बेकायदा पर्यटक वाहतूक करीत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Taxi Association

बेकायदा पर्यटक वाहतूक करणाऱ्या सिंधुदुर्गातील एका टेम्पो ट्रॅव्हल विरोधात कारवाई करावी, अशी मागणी गोवा टॅक्सी असोसिएशनच्या वतीने पत्रादेवी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

असोसिएशनचे सिद्धेश धारगळकर यांनी सांगितले की, मळगाव, सिंधुदुर्ग येथील एक टेम्पो ट्रॅव्हल व्यावसायिक गोव्यात बेकायदा पर्यटक वाहतूक करीत आहे.

तसेच एकाच गाडीचा नंबर दुसऱ्या गाड्यांना वापरून तो महाराष्ट्र तसेच गोवा सरकारला फसवत आहे. कुठल्याही प्रकारचे शुल्क वा टॅक्स न भरता हा इसम व्यवसाय करीत आहे. हल्ली गोव्यात जी गाडी पकडली तोच नंबर असलेली अन्य एक गाडी पर्यटकांना घेउन महाराष्ट्रात देवदर्शन करताना आढळून आली. याबाबत महाराष्ट्र पोलिस, वाहतूक विभाग आणि गोवा वाहतूक खात्याकडे त्यांनी तक्रार केली आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी टॅक्सी संघटनेचे तसेच टेम्पो ट्रॅव्हलचे नारायण चोडणकर, दापोली शिरोडकर, निशांत परब, सुदीप शेट्ये, अभिजित साळगावकर, साभाजी गावकर आदी उपस्थित होते.

गोव्यातील व्यावसायिकांना फटका

धारगळकर यांनी सांगितले की, पर्यटकांना आणण्यासाठी तसेच पर्यटन स्थळावर नेण्यासाठी आम्ही कायदेशीररीत्या व्यवसाय करतो.

गोव्यातील अनेक बेरोजगार युवकांनी बँकेकडून कर्ज घेउन वाहने घेतली आहेत. मात्र अशा बेकायदा प्रकारामुळे गोव्यातील व्यावसायिकांना याचा फटका बसत आहे, असे ते म्हणाले. या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

Goa Politics: मंत्रीपद देतो म्हटलं की धावत येतील, विरोधकांच्या एकीचा उपयोग होणार नाही, 2027 मध्ये गोव्यात भाजपचीच सत्ता; विश्वजीत राणे

Cricket Controversy: "आपसी रंजिश, गुस्सा और खराब भाषा..." ज्युनियर्सवर हल्ल्याच्या आरोपानंतर बांगलादेशी कर्णधाराचा मोठा खुलासा, पोस्ट करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT