Goa Bench Of Bombay High Court Dainik Gomantak
गोवा

पिसुर्लेतील खनिज वाहतूक बंद ठेवण्याचे कोर्टाचे आदेश

खनिज ग्रेड उघड न करता केलेल्या ई लिलावाबाबत कोर्टाने सरकारकडे मागितले स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

पणजी : पिसुर्लेतील खनिज वाहतुकीबाबत कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. पिसुर्लेतून सुरु असलेली खनिज वाहतूक बंद ठेवण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे. टीसी 95/52 मधील खनिज ग्रेड उघड न करता केलेल्या ई लिलावाबाबत कोर्टाने राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 20 एप्रिलला होणार आहे.

पिसुर्ले येथील खाणीवरून जी खनिज विक्री झालेली आहे, त्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा (Fraud) झाला असल्‍याचा आरोप गोवा फाऊंडेशनचे संचालक क्लॉड आल्वारीस यांनी केला आहे. एकूण 90 कोटींचा माल वेदांता कंपनीला फक्त 10 कोटी रुपयांना विकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

आज घेतलेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत अल्वारीस यांनी हा आरोप करताना या प्रकरणात एसआयटी किंवा सीबीआयद्वारे (CBI) चौकशी करण्याची गरज व्यक्त केली. याच मालाच्या वाहतुकीला विरोध केल्यामुळे हनुमंत परब यांना मारहाण करण्यात आली होती आणि अन्य आंदोलकांना अटक करण्यात आली होती. मुळातच ही संपूर्ण वाहतूक बेकायदेशीर असून ती करण्यासाठी खाण (Mining) खाते आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी कशी दिली याचीही चौकशी केली पाहिजे असे आल्वारीस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT