पिसुर्ले खनिज विक्रीप्रकरणी 80 कोटींचा आर्थिक घोटाळा

गोवा फाऊंडेशन: 90 कोटींचा माल फक्त 10 कोटींना विकला
Goa Mine
Goa MineDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: पिसुर्ले येथील खाणीवरून जी खनिज विक्री झालेली आहे, त्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा झाला असल्‍याचा आरोप गोवा फाऊंडेशनचे संचालक क्लॉड आल्वारीस यांनी केला आहे. एकूण 90 कोटींचा माल वेदांता कंपनीला फक्त 10 कोटी रुपयांना विकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

आज घेतलेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत अल्वारीस यांनी हा आरोप करताना या प्रकरणात एसआयटी किंवा सीबीआयद्वारे चौकशी करण्याची गरज व्यक्त केली. याच मालाच्या वाहतुकीला विरोध केल्यामुळे हनुमंत परब यांना मारहाण करण्यात आली होती आणि अन्य आंदोलकांना अटक करण्यात आली होती. मुळातच ही संपूर्ण वाहतूक बेकायदेशीर असून ती करण्यासाठी खाण खाते आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी कशी दिली याचीही चौकशी केली पाहिजे असे आल्वारीस म्हणाले.

Goa Mine
गोव्यात अनेक ठिकाणी वाहतूक नियम फलक नाहीत

हा खनिज माल लीज क्षेत्राबाहेर उत्खनन करून काढला असल्याने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्याचा मालकीहक्क राज्य सरकारकडे येण्याची गरज आहे. मात्र सदर माल विकण्यासाठी केल्या जाणाऱ्या वाहतुकीला खाण खातेच ना हरकत दाखला देते. यावरून या बेकायदेशीर व्यवहाराला स्वतः खाण खाते उत्तेजन देते हे स्पष्ट होत आहे. नजीकच्या काळात आणखीही अशी बेकायदेशीर वाहतूक होणार याची माहिती गोवा फाऊंडेशनला मिळाली आहे असे आल्वारीस यांनी सांगितले.

Goa Mine
गोव्यात असह्य उकाडा; तापमानात आणखी वाढ होण्याची शक्‍यता

लीज क्षेत्राबाहेर खनिज माल उत्खनन करून काढला असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्‍या आदेशानुसार त्याचा मालकीहक्क राज्य सरकारकडे येण्याची गरज आहे. मात्र सदर माल विकण्यासाठी केल्या जाणाऱ्या वाहतुकीला खाण खातेच ना हरकत दाखला देते. यावरून या बेकायदेशीर व्यवहाराला हे खातेच उत्तेजन देत असल्‍याचे स्पष्ट होते.

- क्‍लॉड आल्‍वारीस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com