'Corona| H3N2 Dainik Gomantak
गोवा

Virus Alert : वाढत्या संसर्गामुळे राज्यांनी सतर्क राहावे!

केंद्र सरकार : राज्यात कोरोनाचे 40 नवे रुग्ण; लसींसाठी पाठपुरावा

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Government Virus Alert: कोरोना आणि इन्फ्लूएन्झा रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना केल्या आहेत.

दरम्यान, राज्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा लसीकरण सुरू करण्यासाठी राज्य सरकारने केंद्रीय आरोग्य विभागाला पत्र पाठविले आहे.

राज्यातील अनेक नागरिकांनी कोरोनाच्या बूस्टर डोसकडे पाठ फिरवली होती. कदाचित त्यांना बुस्टर डोसची गरज पडू शकते.

गेल्या काही आठवड्यांत काही राज्यांमध्ये कोरोना चाचण्या कमी झाल्या आहेत आणि जागतिक आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या मानकांच्या तुलनेत सध्याची चाचणी पातळी अपुरी आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या सुचनेनुसार, कोरोनासंदर्भात ठराविक चाचणी नियमित करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही नव्या विषाणूची ओळख पटवणे आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलण्यासाठी या चाचण्या महत्त्वाच्या असल्याचे केंद्राने म्हटले आहे.

10 व 11 रोजी देशव्यापी मॉकड्रिल

आरोग्य मंत्रालयाद्वारे 10 व 11 एप्रिल रोजी देशव्यापी मॉक ड्रिलचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्व जिल्ह्यांतील आरोग्य सुविधा (सार्वजनिक आणि खासगी दोन्ही) सहभागी होणे अपेक्षित आहे. 27 मार्च रोजी होणाऱ्या ऑनलाईन बैठकीत मॉक-ड्रिलचा तपशील सर्व राज्यांना कळविला जाईल.

नव्या 40 रुग्णांची भर

रविवारी राज्यात 40 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 212 झाली आहे. यामुळे धोका वाढला असून काळजी घ्या, एसओपी पाळा असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.

सुविधा उपलब्ध करा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांनुसार, राज्यांनी सर्व रुग्णालयांमध्ये औषधे, सामान्य खाटांसह आयसीयू खाटा, वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय ऑक्सिजन, लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याचे सांगितले आहे. तसेच लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यावरही भर देण्याचे नमूद करण्यात आले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Final: तगड्या मास्टरप्लॅनची गरज! WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला पुढील 9 पैकी किती सामने जिंकावे लागणार?

Sheikh Hasina: फाशीच्या शिक्षेनंतर शेख हसीना यांना कोर्टाचा मोठा झटका, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सुनावली 21 वर्षांची शिक्षा; अवामी लीगचा राजकीय षडयंत्राचा आरोप

Goa Cabinet Decision: खाण व्यवसायाला दिलासा! ट्रकसाठी रस्ता कर सवलत आता 2027 पर्यंत वाढवली; वाचा गोवा मंत्रिमंडळाचे तीन महत्त्वाचे निर्णय

Pooja Naik: 'पूजा नाईकच्या आरोपांना पुरावा मिळेना', DGP आलोक कुमार यांचा खुलासा; प्रकरणाचा तपास थंडावणार?

अग्रलेख: गोव्यात गुन्हा करा, 'बिनधास्त पसार' व्हा! सुरक्षा यंत्रणांना जाग येण्यापूर्वीच गुन्हेगार गायब

SCROLL FOR NEXT