Goa Mango Dainik Gomantak
गोवा

Art Academy : कला अकादमीत राज्यस्तरीय आंबा प्रदर्शन; १७ व १८ मे रोजी आयोजन

Art Academy : गोवा राज्यात आंब्याची झाडे लावलेले कोणतेही शेतकरी, वैयक्तिक, नीम-सरकारी संस्था प्रदर्शन आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यास पात्र आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Art Academy :

पणजी, कृषी संचालनालयातर्फे १७ व १८ मे रोजी कला अकादमी येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय आंबा प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

गोव्यात लागवड केलेल्या विविध स्थानिक आंब्याच्या जाती ओळखणे आणि त्यांची देखभाल करणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे.

प्रदर्शनादरम्यान राज्यात लागवड केलेल्या आंब्याच्या विविध जाती प्रदर्शित केल्या जातील. आंबा उत्पादन तंत्रज्ञान, विपणन आणि आंब्याच्या इतर बाबींवर प्रात्यक्षिके, कार्यशाळा, सेमिनार आयोजित केले जाईल. गोव्याच्या विविध जाती, संकरित जाती, घोटा, विदेशी जाती आणि इतर भारतीय जातींच्या आंब्याच्या फळांच्या स्पर्धा या प्रदर्शनादरम्यान घेण्यात येणार आहेत.

गोवा राज्यात आंब्याची झाडे लावलेले कोणतेही शेतकरी, वैयक्तिक, नीम-सरकारी संस्था प्रदर्शन आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यास पात्र आहेत.

सहभागी कितीही प्रवेशिका सादर करू शकतात आणि प्रत्येक प्रवेशामध्ये किमान ३ आंबे असावेत. कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. प्रत्येक श्रेणीतील सर्वोत्तम तीन प्रवेशासाठी रोख पारितोषिके दिली जातील.

सर्व सहभागींना प्रमाणपत्रे दिली जातील. प्रवेशिका १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्यापूर्वी विभागीय कृषी कार्यालयात सादर कराव्यात किंवा १७ मे रोजी थेट कार्यक्रमस्थळी सादर केल्या जाऊ शकतात.

लोणचे, जाम, ज्यूस स्पर्धा

फळे आणि आंबा मूल्यवर्धित उत्पादने (लोणचे, जाम, ज्यूस, लेदर इ.) ची स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था यांनी प्रवेश अर्ज, नियम आणि इतर तपशिलासाठी जवळच्या विभागीय कृषी कार्यालयातून मिळवू शकतात किंवा www.agri.goa.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT