Ganesh Dainik Gomantak
गोवा

SSC Result : गणेश ठरला वानरमाऱ्यांमध्‍ये पहिला दहावी उत्तीर्ण

SSC Result : कौतुकाचा होतोय वर्षाव : आपल्‍या समाजबांधवांसाठी बनला प्रेरणेचा स्रोत

गोमन्तक डिजिटल टीम

SSC Result :

पणजी, गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ९२.३८ टक्के लागला. यावर्षी देखील मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या. शिवाय अनेक सरकारी शाळांचा निकाल १०० टक्के लागला.

त्‍यात आणखी एक आनंदाची बातमी म्‍हणजे राज्यातील वानरमारे समाजातील गणेश पवार हा दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्‍हणजे अशी कामगिरी करणारा तो या समाजातील पहिलाच विद्यार्थी ठरला आहे.

गणेश पवारला दहावीच्या परीक्षेत ४४ टक्के गुण मिळाले. वाळपे-विर्नोडा येथील विकास हायस्कूल शाळेत तो शिक्षण घेत आहे. वानरमारे समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांवर मात करत गणेश दहावी पास झाला आहे.

चार दशकांहून अधिक काळ गोव्यात स्थायिक झालेल्‍या वानरमारे समाजात शिक्षणाला फार कमी महत्त्‍व दिले जाते. वानरमारे समाज हा भारतातील असुरक्षित आदिवासी गटांपैकी एक म्हणून ओळखला जातो.

गोवा राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष पीटर एफ. बोर्जेस म्हणाले की, ‘‘गणेशने मिळविलेल्या यशाचा आम्हाला अभिमान आहे. हे यश गणेश, वानरमारे समाज आणि शिक्षणाच्या ताकदीवर विश्‍‍वास ठेवणाऱ्या आपल्या सर्वांचे आहे.’’

म्‍हणूनच गणेशचे यश खूप मोठे : दशरथ मोरजकर

गोव्‍यात वानरमारे समाजाच्‍या दोन वस्‍त्‍या आहेत. एक निरंकाल-फोंडा येथे व दुसरी वळपे, विर्नोडा-पेडणे येथे. निरंकाल येथील या लोकांची वस्‍ती वारंवार स्‍थलांतर करते. त्‍यामुळे तेथील मुले अजून दहावीपर्यंत पोचलीसुद्धा नाहीत. म्‍हणूनच गणेशचे यश खुलून दिसते, असे कातकरी प्रकल्‍प समन्‍वयक दशरथ मोरजकर यांनी सांगितले.

हे माझे एकट्याचे यश नसून संपूर्ण समाजाचे आहे. शिक्षणाने ज्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. शाळेतील माझा प्रवास आव्हानात्मक होता. परंतु चिकाटीने आपले नशीब बदलू शकते हे मला शिकता आले. मला आशा आहे की माझ्यामुळे समाजातील इतर मुले देखील शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त होतील.

- गणेश पवार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT