Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Goa 11th Admission: सरकारी शाळांना प्राधान्य देण्याचे मुख्यमंत्री सावंत यांचे आवाहन.
Goa 11th Admission:
Goa 11th Admission:
Published on
Updated on

Goa 11th Admission

दहावीच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारी शाळांसाठी जोरदार बॅटींग केली. यंदा दहावीच्या परीक्षेत 78 पैकी 41 सरकारी शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

येथे असणाऱ्या अत्याधुनिक सुविधांचा विचार करून राज्यातील पालकांनी आपल्या मुलांना सरकारी शाळेतच शिकवावे, असे आवाहन त्यांनी केले.

मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी अकरावीच्या प्रवेशावेळी कोणतेही विद्यालय अवाजवी शुल्क आकारत असल्याची तक्रार आल्यास त्याची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी सर्व समर्पित शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे मनपूर्वक अभिनंदन केले.

Goa 11th Admission:
Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

सुविधांवर भर

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी गोव्याच्या सरकारी शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम, सुधारित लायब्ररी, प्रगत प्रयोगशाळा, सुधारित वाहतूक सुविधा आणि प्रशिक्षित कर्मचारी यांचा समावेश करून सर्वसमावेशक सुधारणा केल्या जात आहेत.

गोव्यातील मुलांचे उज्ज्वल शैक्षणिक भविष्य घडविण्यासाठी शैक्षणिक पायाभूत सुविधा आणि मानव संसाधन या दोन्हींचा दर्जा उंचावत या घडामोडी सुरू ठेवण्याबात सरकार वचनबद्ध असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com