Meritorious Student Gomantak Digital Team
गोवा

Bicholim : दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा डिचोली सम्राट क्‍लबतर्फे गौरव

रामचंद्र गर्दे : डिचोली सम्राट क्‍लबतर्फे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली : आजच्या मुलांनी स्वतःला घडविताना विविध क्षेत्रांचा परिपूर्ण अभ्यास करावा. पालकांनीसुद्धा शिक्षणात घडणाऱ्या बदलांबाबत सतर्क रहावे. विद्यार्थानी नेहमीच उत्कृष्टतेचा ध्यास धरावा आणि आपल्यातील सुप्‍त गुण शोधून त्याच्यावर अधिक भर द्यावा, असे मत शिक्षणतज्‍ज्ञ आणि माजी मुख्याध्यापक रामचंद्र गर्दे यांनी व्यक्त केले.

डिचोली सम्राट क्लब आयोजित दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात गर्दे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी सम्राट क्लबचे अध्यक्ष नीलेश टोपले, सचिव डॉ. प्रवीण सावंत, गोपाळ मोरजकर आणि शेखर नाईक उपस्थित होते.

या सोहळ्यात यंदाच्या शालान्‍त परीक्षेत डिचोली शहरातील विविध शाळांमधून प्रथम आलेल्या प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच पुणे विद्यापीठातून बासरीवादनात ‘मास्टर इन परफॉर्मिंग आर्टस्’ ही पदवी घेतलेले गिरीश वझे याचा गौरव करण्यात आला.

प्रारंभी नीलेश टोपले यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन डॉ. प्रवीण सावंत यांनी केले तर शेखर नाईक यांनी आभार मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी राहुल कवळेकर, विश्वास गावस, संतोष माशेलकर, रोहिदास गाड आणि सम्राटच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सत्‍कारमूर्ती विद्यार्थी : श्रवण कासार, श्रेयस सावंत आणि मधूर चंदशेखर नार्वेकर (श्री शांतादुर्गा हायस्कूल), स्वरा पळ, सानिशा मळीक आणि आर्या तिरोडकर (अवर लेडी ऑफ ग्रेस हायस्कूल) रोहितकुमार मुखिया, भुवना देसाई, गावडे (राधाकृष्ण हायस्कूल), पूजा गोडेगिरी, बागेश्री जाधव, आणि साहिल कुमार पासवान (छत्रपती शिवाजी महाराज सरकारी हायस्कूल) यांचा गौरवप्राप्‍त विद्यार्थ्यांमध्‍ये समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT