Bicholim News : डिचोलीत न्यायालयाकडील विक्रेत्यांचे बाजारात स्थलांतर

न्यायालयाकडील रस्त्याच्या बाजूच्या विक्रेत्यांचे बाजारात स्थलांतर करण्याच्या निर्णयाचे ग्राहक व नागरिकांनी स्वागत केले आहे
Bicholim News
Bicholim NewsGomantak Digital Team
Published on
Updated on

डिचोली न्यायालयाकडील बाजारात जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने बसणाऱ्या विक्रेत्यांचे अखेर तेथून स्थलांतर करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता.२) पालिकेने ही कारवाई केली. या विक्रेत्यांची आता बाजारात व्यवस्था करण्यात आली आहे.

मुख्य रस्त्यावरून न्यायालयाजवळून बाजारात जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने जागा अडवून काही विक्रेते बेकायदेशीरपणे व्यवसाय करीत होते. या विक्रेत्यांकडे ग्राहकही गर्दी करीत होते. या विक्रेत्यांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत होता. अखेर पालिकेने या विक्रेत्यांविरोधात कारवाई केली. या विक्रेत्यांना तेथून हटवून त्यांना बाजारात जागा उपलब्ध करून दिली आहे.

Bicholim News
Goa Beach Shacks: किनारपट्टी भागातील तीस टक्के शॅक्स दिल्लीवाल्यांकडे- खंवटे

न्यायालयाकडील रस्त्यावरील विक्रेत्यांमुळे मोठी समस्या निर्माण होत होती. एखादेवेळी अपघातही घडण्याची शक्यता होती. म्हणून विक्रेत्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला, असे कुंदन फळारी यांनी सांगितले.

Bicholim News
Goa News : आम्हाला घरी पाठवू नका; संजीवनी कामगारांचे आर्जव

निर्णय चांगला; पण..!

न्यायालयाकडील रस्त्याच्या बाजूच्या विक्रेत्यांचे बाजारात स्थलांतर करण्याच्या निर्णयाचे ग्राहक व नागरिकांनी स्वागत केले आहे. मात्र, या कारवाईत सातत्य हवे. यापूर्वी अनेकदा या रस्त्यावरील विक्रेत्यांना हटविले आहे. मात्र, काही दिवसांनंतर विक्रेते पुन्हा आपला मोर्चा याठिकाणी वळवतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com