Sankalp Amonkar Dainik Gomantak
गोवा

MLA Sankalp Amonkar: विशेष विद्यार्थ्यांसोबत विशेष रक्षाबंधन

न्यू डाउन आशादीप शाळेच्या विशेष विद्यार्थ्यांनी साजरा केली रक्षाबंधन

दैनिक गोमन्तक

वास्को: न्यू डाउन आशादीप शाळेच्या विशेष विद्यार्थ्यांनी गुरुवारी रक्षाबंधनानिमित्त मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांना राखी बांधली. रक्षाबंधनाचे अवचित्य साधून हेडलँड सडा येथील न्यू डाऊन आशादीप शाळेच्या सुमारे 20 विशेष विद्यार्थ्यांनी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांना त्यांच्या सडा मतदार संघ कार्यालयात राखी बांधल्या.

(Special Rakshabandhan by MLA Sankalp Amonkar with special students)

याप्रसंगी आमदार आमोणकर यांनी विशेष मुलांच्या हावभावाने खूप स्पर्श झाला आणि विशेष मुलासोबत हा सण साजरा केल्याचा आनंद मी व्यक्त करू शकत नसल्याचे ते म्हणाले. रक्षाबंधन हेच भावाचे आपल्या बहिणीवरील प्रेमाचे द्योतक आहे.

मला शाळा आणि विशेष मुलांना वैयक्तिक व आमदार या नात्याने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देऊन जेव्हा त्यांना माझी गरज भासेल तेव्हा मी शाळेसाठी उपलब्ध असेल असे आमोणकर यांनी सांगितले.

Goa School Merger : सरकारचे खासगी शाळांना प्रोत्‍साहन; आपचा आरोप

‘आप’ने केलेली सूचना सकारात्मकतेने घेण्याऐवजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आपले सरकार सरकारी शाळा चालवण्यास सक्षम आहे. विरोधकांनी शाळा चालवण्याचे सल्ले देऊ नयेत, असे विधान केले आहे. त्यामुळे गर्वाचे घर खाली असते, हे मुख्यमंत्र्यांनी विसरता कामा नये.

भाजप सरकार असक्षम ठरल्यानेच गेल्या दहा वर्षांत सरकारी शाळांची संख्या घटली आहे. मात्र, या दहा वर्षांत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून चालवल्या जाणाऱ्या खासगी शाळा भरभराटीला आल्या आहेत, असा टोला आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी लगावला आहे.


पक्षाच्या कार्यालयात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेस सुरेल तिळवे, वाल्मिकी नाईक यांची उपस्थित होती. भाजप सरकार गोव्यातील मुलांच्या भवितव्याशी खेळत आहे. सरकारी शाळा कशा चालवल्या जातात आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा कशा प्रदान केल्या जातात हे पाहण्यासाठी, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी आणि मंत्र्यांचे शिष्टमंडळ दिल्लीत घेऊन जाण्यास आप तयार आहे. त्याचा सर्व खर्च आपच्यावतीने केला जाईल, असाही उपरोधिक टोला ॲड. पालेकर यांनी लगावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT