Forensic Medicine: रविवारी मडगावात परिसंवाद

निवृत्त न्यायाधीश उत्कर्ष बाकरे, प्रसिध्द लेखक दामोदर मौजो राहणार उपस्थित
forensic medicine
forensic medicineDianik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: इंडियन अकादमी ऑफ फॉरेन्सिक मेडिसिनची 50 वर्षपुर्ती साजरी करण्याच्या निमित्ताने गोवा वैद्यकीय महविद्यालय व दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभाग व राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ - गोवा कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने दि 14 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय परिसंवाद आणि राष्ट्रीय चर्चा सत्रांचे आयोजत केले आहे.

(National Forensic Medicine Seminar at Margao on 14th August)

forensic medicine
दुचाकी चोरट्यास फोंडा पोलीसांनी घेतलं ताब्यात

मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या सभागृहात सदर परिसंवाद होणार असून यात देशातील नामांकित फॉरेन्सिक तज्ञांसह सुमारे 200 फॉरेन्सिक डॉक्टर प्रतिनिधी आणि भारतभरातील सुमारे 100 फॉरेन्सिक सायन्स प्रतिनिधींनी सहभागी होणार आहेत.

forensic medicine
Casino: प्रवेशद्वारावर तिरंग्याची कमान; युरी आलेमाव यांच्याकडून निषेध

दिवसभर चालणार्‍या या राष्ट्रीय परिसंवादाची थीम “डेथ डिझर्व्हस डिग्निटी – आमचा त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन..” अशी असून या मुद्द्याला गल धरून संपुर्ण परीसंवाद होणार आहेत. यात गोवा पोलीस, गोवा राज्य मानवाधिकार आयोग, सेंटर ऑफ एथिक्स - मंगळुर आणि इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस यांचा सहयोग आहे.

गोवा मानवाधिकार आयोग अध्यक्ष न्या. उत्कर्ष बाकरे, गोवा पोलीस महासंचालक जसपाल सिंग, नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी गोवा कॅम्पसचे संचालक नवहिंद कुमार चौधरी, वरिष्ठ सरकारी वकील अ‍ॅड. पूनम भरणे, इंडियन अॅकॅडमी ऑफ फॉरेन्सिक मेडिसिनचे अध्यक्ष डॉ मुकेश यादव आणि फॉरेन्सिक मेडिसिनमधील इतर वरिष्ठ प्राध्यापक तथा डॉक्टरर्स या कार्यक्रमात प्रामुख्याने सामील आहेत.

तसेच यांचे गेल्या पाच दशकांमध्ये फॉरेन्सिक मेडिसिनचा विषय म्हणून झालेली वाढ या विषयावर डॉ. एन.के. अग्रवाल (संचालक, प्राध्यापक, एफएमटी यूसीएमएस आणि जीटीबी हॉस्पिटल दिशा गार्डन दिल्लीचे एचओडी, मृत्यू आणि सन्मान या विषयावर डेसमंड डी कोस्टा (सदस्य गोवा राज्य मानवी हक्क) भाष्य होणार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्री दामोदर मावजो हे 'मृत्यू सन्मानास पात्र आहे' या विषयावर भाष्य करणार आहेत. तर रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांच्या विरोधात झालेल्या हिंसा विषयी डॉ. मनीष श्रीगिरीवार (प्रा. एचओडी एम्स नागापूर – महाराष्ट्र) हे बोलणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com