Goa School Merger : सरकारचे खासगी शाळांना प्रोत्‍साहन; आपचा आरोप

भाजप कार्यकर्त्यांच्या शाळांची भरभराट होणार असल्याचा आप नेत्यांचा निशाणा
Amit Palekar | Valmiki Naik | AAP Goa PC
Amit Palekar | Valmiki Naik | AAP Goa PCDainik Gomantak

Goa School Merger : ‘आप’ने केलेली सूचना सकारात्मकतेने घेण्याऐवजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आपले सरकार सरकारी शाळा चालवण्यास सक्षम आहे. विरोधकांनी शाळा चालवण्याचे सल्ले देऊ नयेत, असे विधान केले आहे. त्यामुळे गर्वाचे घर खाली असते, हे मुख्यमंत्र्यांनी विसरता कामा नये. भाजप सरकार असक्षम ठरल्यानेच गेल्या दहा वर्षांत सरकारी शाळांची संख्या घटली आहे. मात्र, या दहा वर्षांत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून चालवल्या जाणाऱ्या खासगी शाळा भरभराटीला आल्या आहेत, असा टोला आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी लगावला आहे.

पक्षाच्या कार्यालयात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेस सुरेल तिळवे, वाल्मिकी नाईक यांची उपस्थित होती. भाजप सरकार गोव्यातील मुलांच्या भवितव्याशी खेळत आहे. सरकारी शाळा कशा चालवल्या जातात आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा कशा प्रदान केल्या जातात हे पाहण्यासाठी, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी आणि मंत्र्यांचे शिष्टमंडळ दिल्लीत घेऊन जाण्यास आप तयार आहे. त्याचा सर्व खर्च आपच्यावतीने केला जाईल, असाही उपरोधिक टोला ॲड. पालेकर यांनी लगावला आहे.

Amit Palekar | Valmiki Naik | AAP Goa PC
Goa School Merger : आमोणेत शाळा विलिनीकरणास तीव्र विरोध

मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांकडे बोट दाखवू नये
ॲड. पालेकर म्हणाले की, राज्यातील सरकारी आणि प्राथमिक शाळांच्या झालेल्या दूरवस्थेसाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शिक्षकांना जबाबदार धरले आहे. शिक्षकांकडे बोट दाखवण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी शिक्षणमंत्री म्हणून केलेल्या कामगिरीचे विश्लेषण करावे, असा टोला आपने हाणला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com