Monsoon Rain Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: गोवेकरांनो काळजी घ्या! 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; वादळी वाऱ्याचा इशारा

Goa Rain: १६ आणि १७ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता, सतत झोतदार वारे व १८ ते २१ जूनदरम्यान मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी जोरदार सरी बरसण्याची शक्यता वर्तविली आहे.

Sameer Panditrao

पणजी: नैऋत्य मोसमी पावसाचा जोर राज्यात दिवसेंदिवस वाढतच हवामान विभागाने पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा जारी केला आहे. रविवारी पणजी शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. गेल्या २४ तासांत उत्तर गोव्यात ३.१६ इंच आणि दक्षिण गोव्यात ४.१५ इंच पावसाची नोंद करण्यात आली.

१६ आणि १७ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता, सतत झोतदार वारे व १८ ते २१ जूनदरम्यान मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी जोरदार सरी बरसण्याची शक्यता वर्तविली आहे. हवामान विभागाने १६ आणि १७ जून रोजीपर्यंत ऑरेंज अलर्ट आणि नंतर यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस पणजी आणि मुरगाव भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून, वादळी वाऱ्यांचा वेग ६० किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो.

हवामान विभागाने १५ जून रोजी दिलेल्या जिल्हानिहाय इशाऱ्यानुसार, १५ ते २१ जून या सात दिवसांच्या कालावधीत उत्तर व दक्षिण गोव्यातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे, तर काही भागांत ६० किमी प्रतितास झोतासह वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT