Goa Tenant verification Dainik Gomantak
गोवा

Goa Tenant verification: भाडेकरू, पर्यटक पडताळणी हवीच; दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी

Tenant verification: वाढत्या गुन्हेगारी कारवाया आणि सार्वजनिक सुरक्षेचा धोका लक्षात घेता दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस यांनी जिल्ह्यातील भाडेकरू आणि पर्यटकांची कडक पडताळणी अनिवार्य करणारा एक आदेश जारी केला आहे.

Sameer Amunekar

मडगाव : वाढत्या गुन्हेगारी कारवाया आणि सार्वजनिक सुरक्षेचा धोका लक्षात घेता दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस यांनी जिल्ह्यातील भाडेकरू आणि पर्यटकांची कडक पडताळणी अनिवार्य करणारा एक आदेश जारी केला आहे.

संभाव्य दहशतवादी व अन्य समाजविघातक घटकांसह गुन्हेगारांकडून भाड्याने निवासस्थाने घेऊन त्यांचा गैरवापर करण्याचे प्रकार रोखणे हा या आदेशाचा उद्देश आहे. या आदेशानुसार, इमारती, फ्लॅट आणि तात्पुरत्या निवासस्थानांसह निवासी परिसरांच्या सर्व मालकांना आता सर्व भाडेकरू किंवा रहिवाशांची ओळख पडताळणी करणे आवश्यक आहे.

ही पडताळणी मतदार ओळखपत्रे, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पासपोर्ट किंवा स्मार्ट कार्ड यासारख्या वैध ओळखपत्रांचा वापर करून करावी लागेल. हा आदेश जे कोणत्याही प्रकारचा निवास प्रदान करतात अशा हॉटेल, लॉज, गेस्टहाऊस, पेइंग गेस्ट निवासस्थाने, कुटिरे आणि धार्मिक संस्थांच्या मालकांना आणि व्यवस्थापकांना लागू होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GST on Sports: क्रिकेट प्रेमींसाठी वाईट बातमी, सामने पाहणं आणखी महाग होणार, तिकिटांच्या किमतींवर इतका GST आकारला जाणार

Sara Tendulkar Relationship: भावा पाठोपाठ बहीण पण उरकणार साखरपुडा? सचिनच्या लेकीचा Mistry Boy कोण, गोव्यातील फोटो VIRAL

'खुनी हनिमून' ते 'छावा' गोव्यात मांडवीच्या पाण्यावर रंगला अनोखा गणेश विसर्जन सोहळा; युनिक सांगोडोत्सव पहावाच लागतोय Watch Video

Pitru Paksha 2025: ‘या’ दिवशी सुरू होतोय पितृ पक्ष, पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काय कराल? जाणून घ्या तारीख आणि नियम

Cricketer Retierment: आशिया कपपूर्वी भारताच्या 'या' स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम, IPLमध्ये 3 वेळा घेतलीय हॅटट्रिक

SCROLL FOR NEXT