Goa Politics: 'सभापती सरकारच्या हातचे बाहुले' सरदेसाईंच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध; अपुऱ्या माहितीच्या आधारे आरोप करू नयेत, फळदेसाईंचा सल्ला

Goa Politics News: सभापती हे सरकारच्या हातचे बाहुले झाल्याचा आरोप करून आमदार विजय सरदेसाई यांनी सभापतिपदाचा अवमान केल्याचा दावा करत त्यांच्या या वक्तव्याचा भाजपने निषेध केला.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सभापती हे सरकारच्या हातचे बाहुले झाल्याचा आरोप करून आमदार विजय सरदेसाई यांनी सभापतिपदाचा अवमान केल्याचा दावा करत त्यांच्या या वक्तव्याचा भाजपने निषेध केला. सरदेसाई हे ज्येष्ठ आमदार असल्याने त्यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे आरोप करू नयेत, असा सल्ला समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिला.

भाजप कार्यालयात त्यांनी आमदार दाजी साळकर व प्रेमेंद्र शेट यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, विधानसभा कामकाजाविषयी सत्ताधारी गटाची रणनिती आणि सत्ताधारी आमदारांची प्रलंबित कामे मार्गी लावणे असे दोन विषयांसाठी दोन बैठका होत्या.

त्याला सभापती आले नाहीत. या बैठका संपल्यानंतर सभापती त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले. त्यांच्या मतदारसंघातील कामांच्या फाईली त्यांनी आणल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेले सभापती बैठकीत सहभागी होण्यासाठी आले, असे म्हणणे चूक आहे.

Goa Politics
Goa Fake Police: तोतया पोलिसांचा सुळसुळाट; भरदिवसा दोघांचे दागिने हातोहात लंपास, ज्‍येष्‍ठांसह महिला 'टार्गेट'वर

साळकर म्हणाले, सरदेसाई यांच्या विधानाचा निषेध. सभापतींची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न सरदेसाई यांनी केला. घटनात्मक पदाची आब राखली गेली पाहिजे.

शेट यांनीही सत्ताधारी आमदारांना विधानसभेत वेळ मिळत नाही पण विरोधकांना मिळतो अशी सत्ताधारी आमदारांची भावना असल्याचे नमूद केले.

पक्षपातीपणाचा आरोप करणे गैर!

विधानसभेत विरोधकांना सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त वेळ सभापतींनी नेहमीच दिला आहे हे कामकाजाच्या नोंदीवरून समजते. अशा सभापतींवर पक्षपातीपणाचा आरोप करणे केव्हाही चुकीचे आहे, असे सांगून साळकर म्हणाले, सभापतिपदाची अवहेलना, निर्भत्सना सरदेसाई यांनी करू नये.

Goa Politics
Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

विरोधकांचा आवाज दाबण्याचा सभापतींनी कधीही केला नाही याची जाण तरी त्यांनी ठेवावी. सरदेसाई यांनी आदिवासी समाजात फूट पाडण्यामागे सरकारचा हात असल्याचा बिनबुडाचा आरोप याआधी केला होता. सामाजिक दुही निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो,असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com