Danielle McLaughlin murder case Dainik Gomantak
गोवा

Danielle McLaughlin Murder Trial: हत्या प्रकरणाच्या निकालाला 'हाफ डे'चा खो; डॅनियली मॅक्लॉग्लीन प्रकरणाचा फैसला शुक्रवारी

Danielle McLaughlin Murder Case: न्यायालयाचे कामकाज अर्ध्या दिवसाचे असल्याने हा खटला शुक्रवारी चालणार आहे

Akshata Chhatre

मडगाव: ब्रिटिश बॅगपॅकर डॅनियली मॅकलॉग्लीन हिच्यावर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणाची सुनावणी गुरुवारी (दि. १३ फेब्रुवारी) रोजी दक्षिण गोवा सत्र न्यायालयात होणार होती, मात्र न्यायालयाचे कामकाज अर्ध्या दिवसाचे असल्याने हा खटला शुक्रवारी चालणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी या प्रकरणावर सुनावणी होईल. आरोपीला या खटल्याच्या सुनावणीबद्दल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधून माहिती देण्यात आली आहे.

१३ मार्च २०१७ रोजी काणकोण येथील राजबाग-आगोंद येथे डॅनियली मॅकलॉग्लीन हिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी या खून प्रकरणाचा छडा लावला होता आणि त्यानंतर आरोपी विकट भगत याला भगतवाडा येथून अटक करण्यात आली होती.

२४ वर्षीय विकट भगत आणि डॅनियली मॅकलॉग्लीन यांच्यात मैत्री असल्याची माहिती देखील तपासणी दरम्यान समोर आली.मडगाव तपासानंतर पोलिसांनी आरोपी विकट भगत याच्यावर न्यायालयात एकूण ३७४ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे, यात त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या ३०२ (खून), ३७६ (बलात्कार), ३९४ (जबरी चोरी) व २०१ (पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न) अशा विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मयत डॅनियली मॅकलॉग्लीन हिच्या शरीरावर एकूण ७ जखमा होत्या. वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता जिवंत असल्यास बलात्कार प्रकरणाचे थेट पुरावे सादर करता आले असते, मात्र या प्रकरणात तिच्यावर जंगलात लैंगिक अत्याचार झाला असल्याने आणि तिची हत्या झाल्याने वालिकांना इतर पुराव्यांची मदत घ्यावी लागली होती. मयत डॅनियली मॅकलॉग्लीन हिची आई आणि बहीण न्यायालयीन सुनावणीसाठी गोव्यात आले असल्याची माहिती देखील वकिलांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT