Goa Beach Turtle Death Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: गोव्यातल्या बीचवर हे काय चाललंय? एका आठवड्यात 10 कासवे मृत; प्रदूषण की इतर कारण? होणार तपासणी

Goa Beach Turtle Death: दक्षिण गोव्‍यात मृत कासवे किनाऱ्यावर येऊन पडण्‍याच्‍या घटना घडत असून बाणावली समुद्रकिनाऱ्यावर आणखी एक मृत कासव सापडले.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: एकाबाजूने ऑलिव्‍ह रिडले कासवांच्‍या विणीचा मोसम सुरू झालेला असतानाच किनाऱ्यावर अंडी घालण्‍यासाठी कासवे येताना दिसू लागली आहेत. अशा परिस्‍थितीत दक्षिण गोव्‍यात मृत कासवे किनाऱ्यावर येऊन पडण्‍याच्‍या घटना घडत असून बाणावली समुद्रकिनाऱ्यावर आणखी एक मृत कासव सापडले.

मागच्‍या आठवड्यात काणकोणच्‍या पाळोळे, गालजीबाग व तळपण समुद्रकिनाऱ्यांवर तब्‍बल सहा मृत कासवे येऊन पडलेली आढळून आली. त्‍यानंतर आता बाणावली समुद्रकिनाऱ्यावर आणखी एक मृत कासव येऊन पडलेले दिसले. त्‍याशिवाय मच्‍छीमारांनी पाण्‍यात आणखी तीन मृत कासवे तरंगताना पाहिली आहेत. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कासवे मृत पावलेली दिसल्‍याने आश्‍चर्य व्‍यक्‍त केले जात आहे.

बाणावली येथील मच्‍छीमार पेले फर्नांडिस यांना विचारले असता, अकस्‍मात मृत कासवे पडण्‍याचे प्रकार वाढले आहेत. मासेमारीसाठी समुद्रात जात असताना मी स्‍वत: तीन मृत कासवे पाण्‍यावर तरंगताना पाहिली. यातील बहुतेक कासवे अंडी घालण्‍यासाठी किनाऱ्यावर येणारी होती. त्‍यांचा मृत्‍यू पाण्‍यामध्‍ये कुठले प्रदूषण झाल्‍यामुळे की अन्‍य कारणांमुळे याची चौकशी करण्‍याची गरज त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

पौर्णिमा, अमावास्‍येच्‍या वेळी घडतात प्रकार

वन खात्‍याचे मरिन विभागाचे अधिकारी राजेश नाईक यांना विचारले असता, ही मृत कासवे एकाचबरोबर किनाऱ्यावर येऊन पडली असली तरी ती एकाचबरोबर मेलेली नाहीत. कित्‍येकदा समुद्रात कासवे मरून पडतात आणि तशीच पाण्‍यात ती पडून असतात. मात्र, जेव्‍हा मोठी भरती येते त्‍यावेळी ही मृत कासवे किनाऱ्यावर येऊन पडतात.

हे प्रकार बहुतेक पौर्णिमेच्‍यावेळी किंवा अमावास्‍येच्‍यावेळी होतात. काल अमावास्‍येच्‍यावेळी आलेल्‍या भरतीमुळे ही मृत कासवे किनाऱ्यावर येऊन पडली असावीत, असे ते म्‍हणाले. जी मृत कासवे कुजलेल्‍या अवस्‍थेत नाहीत त्‍यांची उत्तरीय तपासणी करून त्‍यांच्‍या मृत्‍यूचे कारण समजून घेण्‍याचा प्रयत्‍न केला जाणार असल्याचे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या 'DGP'वर निलंबनाची कारवाई, Viral व्हिडिओनंतर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश

Indian Racing League: थ्रिल आणि ॲक्शन! मोपा विमानतळाजवळ रंगणार 'इंडियन रेसिंग लीग'चा थरार; 6 संघांमध्ये चुरस, 'येथे' पाहता येणार Live streaming

India Economy: भारत होणार श्रीमंत अर्थव्यवस्था! दरडोई उत्पन्न पोचणार 4000 डॉलरपर्यंत; वाचा एसबीआय रिसर्चचा Report

Vande Mataram Cyclothon: 25 दिवसांत 6553 किमीची मोहीम! ‘वंदे मातरम् सायक्लोथॉन’चा थरार; तारीख जाणून घ्या..

Goa Latest Updates: दुर्भाट, आडपई फेरीसेवेवर दाट धुक्यामुळे परिणाम

SCROLL FOR NEXT