Sea Turtles: गालजीबाग,आगोंदमध्ये कासवांनी घातली 19191 अंडी! 187 घरट्यातून पिल्ले बाहेर

Galgibaga Agonda Sea Turtles: ४,४११ पिल्लांना समुद्रात सोडण्यापूर्वीच मरण आले. दोन्ही किनाऱ्यावर आतापर्यंत ९,७८५ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत.
Sea Turtles In Goa
Sea Turtles At AgondaDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: गालजीबाग,आगोंद सागरी कासव संवर्धन केंद्रातून १८७ घरट्यांतून पिल्ले बाहेर आली फक्त एक घरट्यातून बाहेर येण्याची प्रतीक्षा. आतापर्यंत १८८ सागरी कासवांनी १९,१९१अंडी घातली होती.

त्यामध्ये गालजीबाग किनाऱ्यावर ४३ सागरी कासवांची ४,६०३ अंडी घातली त्यापैकी ३५८४ अंड्यातून पिल्ले बाहेर येऊन ती समुद्रात सोडण्यात आली. ६८१ अंड्यातून पिल्ले बाहेर नाहीत. तर ३३८ पिल्लांना समुद्रात सोडण्यापूर्वीच मरण आले.

आगोंद किनाऱ्यावर १४३ सागरी कासवांचे आगमन होऊन त्यांनी १४,४८३ अंडी घातली तेथून ६,१०४ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.मात्र ३७४९ अंडी नाही.

४,४११ पिल्लांना समुद्रात सोडण्यापूर्वीच मरण आले. दोन्ही किनाऱ्यावर आतापर्यंत ९,७८५ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत तर समुद्रात सोडण्यापूर्वी मरण आलेल्या पिल्लांची संख्या लक्षणीय असून ती ४,७५४ आहे.

दोन्ही किनाऱ्याव्यतिरिक्त अन्यत्र दोन ठिकाणी दोन सागरी कासव घरट्यात १०५ अंडी होती त्यातील ९७ पिल्ले बाहेर येऊन त्यांना समुद्रात सोडण्यात आले यापैकी फक्त तीन अंड्यातून पिल्ले बाहेर आली नाहीत पांच पिल्ले समुद्रात सोडण्यापूर्वीच मेली.

Sea Turtles In Goa
World Turtle Day: समुद्रमंथनात मंदार पर्वताला आधार देणाऱ्या, गोमंतकीय धर्मजीवनात विष्णुरूप मानलेल्या 'कासवांचे' अस्तित्व संकटात

एकमेव घरट्यातून पिल्ले बाहेर येणे बाकी

आगोंद येथील सागरी कासव संवर्धन केंद्रातून एकमेव घरट्यातून पिल्ले बाहेर येण्याची प्रतीक्षा आहे.या घरट्यात १०२ अंडी असून ती घातल्यास ३६ दिवस झाले आहेत.घरट्यातून पिल्ले बाहेर येण्यासाठी किमान ४५ दिवसांचा कालावधी लागतो. त्याप्रमाणे हवामान पोषक असल्यास जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घरट्यातून पिल्ले बाहेर येण्याची शक्यता असल्याचे दक्षिण गोवा सागरी झोनचे उपक्षेत्रीय वनाधिकारी राजेश नाईक यांनी सांगितले

Sea Turtles In Goa
Sea Turtles: आगोंद, गालजीबाग किनाऱ्यावर 19 सागरी कासवांचे आगमन; 2026 अंड्यांची नोंद

गालजीबाग किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन केंद्रात गालजीबागसह राजबाग,कोळंब,पाटणे,बायणा,वार्का बाणावली,मोबोर व तळपण या किनाऱ्यावर घातलेल्या अंड्याचे स्थलांतर केले जाते तर आगोंद किनाऱ्यावर पाळोळे, काब द राम व खोला किनाऱ्यावर घातलेल्या अंड्यांचे स्थलांतर करून त्याचे संवर्धन केले जाते.

- राजेश नाईक, झोनचे उपक्षेत्रीय वनाधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com