दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन Dainik Gomantak
गोवा

Goa : केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीवर केजरीवालच्या उड्याः फ्रांसिस सार्दिन

दक्षिण गोव्याचे (South Goa) खासदार फ्रांसिस सार्दिन यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

दैनिक गोमन्तक

सासष्टी : दिल्ली (Delhi) हा केंद्र शासित प्रदेश असल्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना केंद्र सरकारकडून कोट्यावधी रुपये मिळत आहे. केजरीवाल यांच्याकडे हा कोट्यावधी निधी खर्च करण्यासाठी पर्याय नसल्यामुळेच दिल्ली वासियांना मोफत वीज (Free electricity) व पाणी ( Water) पुरवून केंद्र सरकारच्या (Central Government) मिळणाऱ्या निधीच्या बळावर उड्या मारीत आहे, असा आरोप दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

केंद्र सरकार या दिल्लीवर कोट्यावधी रुपये खर्च करुन या राज्याला हाजारो कोटी रुपये निधीच्या स्वरुपात पुरवित असल्यामुळे केजरीवाल यांना मोफत वीज व पाणी पुरविण्यास शक्य होत आहे. दिल्ली वासियांना ज्याप्रकारे मोफत वीज व पाणी पुरविण्यात येत आहे, त्याप्रकारे गोमंतकीयांना मोफत वीज व पाणी पुरविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे. पण, हे फक्त आश्वासनच राहणार आहे, असे फ्रांसिस सार्दिन यांनी सांगितले. दिल्लीत अनेक बेकायदेशीर बांधकाम असून ती बांधकाम कायदेशीर करण्यात आलेली आहे. परंतु 10 वर्षा पूर्वीची चर्चचा सांभाळ करण्यास केजरीवाल यांना शक्य झाले नाही, असा आरोपही त्यांनी केला.

कोरोनाच्या काळात गोमंतकीयांनी सरकारचे डोळे उघडल्याने सरकारने राज्यात कर्फ्यू लागू केला होता व त्यामुळेच मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली होती. देशात आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून अशा परिस्थितीत सरकारने घाई करुन मोकळीक निर्माण करु नये, गोव्यात मोकळीक निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणात परप्रांतिय गोव्यात येतील व कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला गोव्यात शिरकाव होण्यासपासून कुणीही रोखू शकणार नाही, असे फ्रांसिस सार्दिन यांनी सांगितले.

पेट्रोल, डिझेलचे दर वाढविण्यात आल्याने जनता रस्त्यावर उतरुन विरोध करीत आहे. पण सरकारला याचे काहीही पडलेले नसून सरकार दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करीत आहे. बंगलादेश, नेपाळ , श्रीलंका सारख्या देशात पेट्रोल, डिझेलचे दर कमी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर लक्ष्य केंद्रीत करुन पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावे, अशी मागणी फ्रांंसिस सार्दिन यांनी केली.

कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे कॉग्रेस पक्षाच्या नेत्यांना घेऊन निर्णय घेत नसल्यामुळे आज कॉग्रेस पक्ष लोकांकडून प्रतिसाद मिळणे बंद झाला आहे. कॉग्रेस पक्षाला सांभळ करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बदलणे आवश्यक बनलेले आहे, असे फ्रांसिस सार्दिन यांनी स्पष्ट केले. गोमंतकीय नागरिकांनी सतत आपल्याला पाठींबा दिला असून गोमंतकीयाना भेडसावणाऱ्या कुठल्याही समस्या भेडसावत असल्यास त्यांचे निवारण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीयांसाठी खास पर्वणी! प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्तींचा गोवा दौरा, वाचा सविस्तर माहिती

Margao: '..पुन्हा परीक्षा घ्या, अन्यथा नगरपालिकेचे काम रोखू'! मडगाव कर्मचारी भरती परीक्षेवरुन काँग्रेस, NSUI आक्रमक

Goa Coconut Price: गोमंतकीयांना दिलासा! नारळ, भाज्यांचे दर उतरले; 'फलोत्पादन'ने विकले 1 लाख नारळ

"हांव खरें तेंच उलायला", एका शब्दाने उडाला गोंधळ; तरीही मंत्री कामत शब्दावर 'ठाम'

Goa Census: गोव्यात 2 टप्प्यांत होणार जनगणना! पूर्णपणे डिजिटल पद्धतीचा वापर; ॲपद्वारे होणार घरांची नोंद

SCROLL FOR NEXT