Goa: पर्यटक नसल्यामुळे भिकाऱ्यांचीही गोव्याकडे पाठ

गोव्यात (Goa) भीक मागण्यास बंदी आहे, हे अनेकांना माहीत नसते. पोलिसांच्या कारवाईनंतर त्यांना त्याची जाणीव होते.
Begging is banned in Goa
Begging is banned in GoaDainik Gomantak

पणजी: कोरोना (Covid-19) महामारीने भल्या भल्यांना जेरीस आणले. रोजंदारीवर पोट भरणारे गरीबही त्यातून सुटले नाहीत. पणजी (Panajim) पदपथावर राहून पोटापुरते काम करून जगणाऱ्या स्थलांतरितांवर कोरोनामुळे भीक मागण्याची वेळ आलीआहे. पणजीत भिकारी क्वचितच दिसतात. गोव्यात भीक मागण्यास बंदी आहे. तरी काही वर्षांपूर्वी एक संघटित टोळी पहाटे भिकाऱ्यांना आणून सोडून संध्याकाळी परत नेत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. (Begging is banned in Goa)

पोलिस कारवाईनंतर तो बंद झाला. सध्या निर्बंधांमुळे पर्यटकांची संख्याही घटली. गोव्यात लाखो देशी व विदेशी पर्यटक येतात.तसेच काही भिकारीही राज्यात दाखल होतात. बहुतांश जणांना गोव्यात भीक मागण्यास बंदी आहे, हे अनेकांना माहीत नसते. त्यामुळे ते कुठेही भीक मागतात. पोलिसांच्या कारवाईनंतर त्यांना त्याची जाणीव होते. त्यानंतर काहीजणांची पावले पुण्या-मुंबईकडे वळतात, तर काहीजण पोलिसांची नजर चुकवत येथेच ठिय्या मारतात.

Begging is banned in Goa
Goa Covid-19 : जुलै महिना गोवेकरांना दिलासा देणारा ठरला

कोरोना महामारीपूर्वी पणजी शहरातील चर्च परिसर, महापालिका इमारतीच्या मागील भागात राहातात. तसेच आझाद मैदान, 18 जून रस्त्याजवळील शेर-ए-पंजाब रेस्टॉरंटजवळ, पणजी बाजार परिसर, बसस्थानक, मिरामार किनारा येथे काही भिकारी दिसत होते. मात्र सध्या एखाद दुसरा भिकारी दिसून येतो.

कोविडमुळे भीक मागण्याची वेळ

कोरोना येण्यापूर्वी आपण कामाला जात असे. खोली करून राहणे शक्य नसल्याने आपल्या कुटुंबासह पदपथावर राहात असे. कुटुंबातील सदस्य महिला व मुले फुगे व इतर काही वस्तू पर्यंटकांना विकून पोटापुरते काही पैसै जमा करत होत्या. मात्र कोरोनामुळे माझी हॉटेलमधील नोकरी गेली व पर्यटक नसल्याने कुटुंबालाही काही काम नाही. त्यामुळे मिळेल ते खाऊन पदपथावर झोपून जगावे लागत आहे. अनेकवेळा भीक मागण्याची वेळही येते, असे केतन शर्मा याने सांगितले.

Begging is banned in Goa
Goa Covid19: आठ महिन्यांनंतर दिलासा, राज्यात एकही मृत्यू नाही

"पणजी परिसरात भीक मागताना कुणी दिसला तर त्याला पोलीस भीक प्रतिबंधक कायद्यानुसार पकडून आणतात. कायद्यानुसार त्याला न्यायालयात उभे केले जाते. न्यायालय त्यांना सोडून देते."

- सुदेश नाईक, पोलिस निरीक्षक, पणजी.

"भिकाऱ्यांना मेरशी येथील निवारा आश्रमात ठेवले होते. मात्र भिकारी तेथे राहात नाहीत. गावी जातो म्हणून सांगून पळून जातात. एखादा आश्रम बांधून भिकाऱ्यांना तेथे ठेवण्याची व्यवस्था करावी."

- तारा केरकर, सवेरा, एनजीओ प्रमुख

"गोवा पर्यटन क्षेत्र असल्याने येथे भिकारी मोठ्या प्रमाणात येतात. मात्र त्यांतील काहीजण चोरी व इतर गुन्हे करून आलेले असतात. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होणे गरजेचे आहे."

- ॲड. रुई फेरेरा, ज्येष्ठ वकील, पणजी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com