Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: मोठा गाजावाजा, पण पुरावा शून्य! 43 कोटींचे ड्रग्ज रॅकेट हवेत विरले; पुराव्याअभावी वास्कोतील वाडेकर दांपत्यासह चौघांची निर्दोष मुक्तता

Goa Drug Racket Acquittal: ४३ कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट प्रकरणात न्यायालयासमोर पुरेसे पुरावे सादर न झाल्याने दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने चार संशयितांना आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त केले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: गेल्या वर्षी मोठा गाजावाजा करत क्राईम ब्रँचने उघडकीस आणलेल्या ४३ कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट प्रकरणात न्यायालयासमोर पुरेसे पुरावे सादर न झाल्याने दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने चार संशयितांना आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त केले. मुक्त करण्यात आलेल्यांमध्ये वास्कोतील वाडेकर दांपत्य रेश्मा व मंगेश यांच्यासह चिराग दुधाट आणि झिंबाब्वेतील एका नागरिकाचा समावेश आहे. या चार संशयितांची निर्दोष मुक्तता झाल्याने क्राईम ब्रँचच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आरोप निश्चितीपूर्वीच्या युक्तिवादावेळी दुधाट याचे वकील ॲड. गॅलिलिओ टेलिस आणि ॲड. नताशा राव यांनी, आपल्या अशीलाने इतर संशयितांना पैसे पाठविल्याचा किंवा त्यांच्यासाठी तिकिटांची व्यवस्था केल्याचा कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आलेला नाही, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तर इतर संशयितांचे वकील ॲड. एस. देसाई, ॲड. ए. गावकर आणि ॲड. एस. सार्दिन्हा यांनी, आपल्या अशीलांनी ड्रग्स मागवले असल्याचे सिद्ध करणारा एकही सक्षम पुरावा नसल्याचे मांडले. न्यायालयाने हे युक्तिवाद मान्य करत सर्व संशयितांना आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त केले.

प्रकरण असे

एप्रिल २०२५ मध्ये क्राईम ब्रँचने ४.३२५ किलो कोकेन जप्त केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे ४३.२० कोटी रुपये होती. हा माल चॉकलेट्स आणि कॉफीच्या खोक्यांमध्ये लपवून आणण्यात आला होता. हा माल घेऊन आलेल्या निबू व्हिसेंट या केरळमधील व्यक्तीला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील तपास अधिकारी पोलिस निरीक्षक लक्षी आमोणकर यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे पदकही प्रदान करण्यात आले होते. क्राईम ब्रँचच्या दाव्यानुसार, हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असून त्याचे थायलंडशी कनेक्शन असल्याचे सांगण्यात आले होते. वाडेकर दांपत्याने हा माल विदेशातून मागवला होता आणि त्यांना दुधाट याचे सहकार्य लाभले होते, असा आरोप करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: महाआघाडी झाली तरी जागावाटपाचा तिढा सुटणार कसा? समान कार्यक्रमाशिवाय आघाडीचे भविष्य अंधारात; सरदेसाईंच्या समीकरणांवरुन संभ्रम!

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

SCROLL FOR NEXT