Goa Crime: दुकानातला QR कोड काढला आणि स्वतःचा लावला, महिला कर्मचाऱ्याने गंडवले मालकालाच; 49 लाख पळवले

Goa Medical QR Code Scam: ‘अबानिया ड्रग स्टोअर्स’ या औषधांच्या दुकानात तब्बल ४९.६८ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
 Goa qr code fraud case
Goa qr code fraud caseDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: येथील ‘अबानिया ड्रग स्टोअर्स’ या औषधांच्या दुकानात तब्बल ४९.६८ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी म्हापसा येथील रहिवासी यतीन नाईक यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेडणे येथील एका महिला कर्मचाऱ्याने फेब्रुवारी २०२० ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नियोजनपूर्वक हा अपहार केला. संबंधित महिलेने दुकानातील इंडियन ओव्हरसीज बँकेचा अधिकृत क्यूआर कोड स्कॅनर हटवून त्या ठिकाणी स्वतःच्या बँक खात्याशी जोडलेला वैयक्तिक स्कॅनर बसविला होता.

 Goa qr code fraud case
Goa Crime: मालपे-पेडणे येथे 1.64 लाखांचा गांजा जप्त! गोवा पोलिसांची कारवाई; चंदगडच्या दोघांना अटक

त्यामुळे ग्राहकांनी औषधांचे बिल भरण्यासाठी स्कॅन केलेली रक्कम थेट दुकानाच्या खात्यात न जाता संशयित महिलेच्या खात्यात जमा होत होती. याशिवाय, तिने सत्तरी को-ऑपरेटिव्ह बँकेत अनधिकृत पिग्मी खाते उघडून या रकमेचा व्यवहार केल्याचेही उघड झाले आहे.

 Goa qr code fraud case
Football Match Fixing: फुटबॉल मॅचफिक्सिंग प्रकरण! आरोपपत्रात 14 खेळाडूंचा समावेश; GFA समितीची चौकशी अंतिम टप्प्यात

सुमारे पाच वर्षे हा प्रकार सुरू राहिल्याने एकूण ४९.६८ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक परेश सिनारी करत असून, अधिक तपशील उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com