South Goa Congress 
गोवा

Zilla Panchayat Election: 'मागच्या दरवाजानं काँग्रेसमध्‍ये कुणालाही प्रवेश दिला नाही', जिल्हाध्यक्षांनी स्पष्टचं सांगितलं; सासष्टीतील पाचही जागांसाठी अर्ज दाखल

South Goa Congress: सासष्टीतील सर्व मतदारसंघांमध्‍ये काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही स्थानिक प्रश्‍‍न असले तरी सर्वजण एकजुटीने निवडणूक लढवण्यास तयार आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: सासष्टीतील सर्व मतदारसंघांमध्‍ये काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही स्थानिक प्रश्‍‍न असले तरी सर्वजण एकजुटीने निवडणूक लढवण्यास तयार आहेत. पक्षात कुणालाही मागील दरवाजाने प्रवेश दिलेला नाही. उमेदवारी देताना पूर्ण तपासणी, निष्ठा, स्थानिक काम व कार्यकर्त्यांशी असणारे संबंध या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करण्यात आला आहे, असे काँग्रेसचे दक्षिण गोवा (South Goa) जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी स्‍पष्‍ट केले.

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिवशी सासष्टी तालुक्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मोठी राजकीय लगबग पाहायला मिळाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासूनच उमेदवार व कार्यकर्त्यांची गर्दी निर्वाचन कार्यालयाबाहेर दिसत होती. नुवे, कोलवा, बाणावली, दवर्ली आणि नावेली या पाचही मतदारसंघांतील उमेदवारांनी अर्ज सादर केले.

अर्ज सादर करणाऱ्यांमध्ये अँथनी ब्रागांझा (नुवे), वेनिसिया कार्व्हालो (कोलवा), लुईझा परेरा ई रॉड्रिगीस (बाणावली), फ्लोरियानो फर्नांडिस (दवर्ली) आणि मेलिफा कार्दोझ (नावेली) यांचा समावेश आहे. उमेदवारांसोबत त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत वातावरणात उत्साह निर्माण केला.

काँग्रेसचे सर्व उमेदवार गेल्या काही दिवसांपासून घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. एका उमेदवाराने सांगितले की, मतदार घरोघरी भेटल्यावर सर्वसामान्यांच्या अनेक समस्या समोर येतात. पाणी, वीज, रस्ते, नितळ प्रशासन, कचरा व्यवस्थापन आदी प्रश्‍‍नांची दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत. गावाच्या एकूण विकासाचे ध्येय ठेवूनच आम्ही प्रचार करत आहोत. दरम्‍यान, सासष्टी तालुक्यात या निवडणुकीत काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी थेट लढती होण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेस निवड प्रक्रियेचे निकष

निष्ठा व पक्षाशी सातत्यपूर्ण संबंध

स्थानिक पातळीवरील कामगिरी

कार्यकर्त्यांशी चांगले संबंध

महिला व युवा नेतृत्वाला प्राधान्य

स्वच्छ, पारदर्शी प्रशासनावर भर

मतदारांच्या प्रमुख तक्रारी

रस्ते व मूलभूत सुविधा

पाणीपुरवठ्याची टंचाई

कचरा व्यवस्थापन

स्थानिक प्रशासनातील विलंब

ग्रामविकासाच्या गरजा

यावेळच्या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस (Congress) पक्षाने युवा, महिलांना प्राधान्‍य देण्‍याबरोबरच स्वच्छ प्रशासनावर विशेष भर दिला आहे. सक्षम आणि कार्यक्षम नेतृत्वाला प्राधान्य देण्याचा आमचा उद्देश आहे.

- सावियो डिसिल्वा, अध्‍यक्ष (दक्षिण गोवा काँग्रेस)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुनेत्रा पवारांनी घेतली पद अन् गोपनीयतेची शपथ, महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला 'उपमुख्यमंत्री'; PM मोदींकडून शुभेच्छा VIDEO

Operation Herof2: बलुचिस्तानमध्ये क्वेटासह 10 शहरांवर बलोच बंडखोरांचा ताबा, पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून पळाले; 10 ठार VIDEO

Pakistan Economy Crisis: "मुनीर अन् मी पैसे मागतो तेव्हा..." शहबाज शरीफ यांनी मांडली आर्थिक गुलामगिरीची व्यथा; परकीय कर्जाच्या अटींपुढे झुकला पाकड्यांचा कणा

Congo Landslide: 'कांगो'मध्ये निसर्गाचा महाप्रलय! मुसळधार पावसानं डोंगराचा कडा कोसळून 200 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये मुलांचाही समावेश VIDEO

Goa Elections 2027: प्लॅनिंग तयार, आता मैदानात उतरा! भाजप अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला 2027 च्या विजयाचा 'महामंत्र'; विधासभा निवडणुकीचं फुंकलं रणशिंग

SCROLL FOR NEXT