

पेडणे: धारगळ मतदारसंघातून जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी ज्ञानेश्वर शिवजी यांना काँग्रेसची उमेदवारी निश्चित झाल्यानंतरही दक्षिण गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी युतीच्या उमेदवाराला पाठिंबा देत शिवजी यांना उमेदवारी डावलली. या निर्णयामुळे काँग्रेसचे नेतृत्व विकले गेल्याचे स्पष्ट होते, असा घरचा अहेर त्याच पक्षाचे प्रवक्ते देवेंद्र प्रभुदेसाई यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते प्रदीप प्रभुदेसाई उपस्थित होते.
दीड महिन्यापूर्वी काँग्रेसतर्फे (Congress) शिवजी यांना अधिकृत उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे आम्ही दोन महिन्यांपासून पूर्ण ताकदीने प्रचाराची तयारी केली. मात्र, काल अचानक उमेदवारी डावलण्यात आल्याचे कळवले. आता आम्ही अपक्ष म्हणून शिवजी यांना मतदारांच्या पाठिंब्याने निवडून आणू. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पक्ष प्रवक्ते म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतरही आज काँग्रेसमधील काही नेत्यांविरोधात बोलण्याची वेळ येणे दुर्दैवी आहे, असे प्रभुदेसाई म्हणाले. काँग्रेसचे काही आमदार स्वतःच आपल्याच कार्यकर्त्यांचे पाय ओढत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
पहिल्यांदाच आमदार पक्ष चालवत आहेत, हे स्पष्ट दिसते. पक्ष हा प्रदेशाध्यक्षाने चालवायचा असतो. आधी दिगंबर कामत यांनी भाजपमध्ये जाऊन काँग्रेसला खिळखिळे केले. आता युरी आलेमावही तेच काम करत आहेत. ज्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, बूथ समित्या नाहीत, अशा पक्षाशी युती करणे हास्यास्पद आहे, असे प्रदीप देसाई यांनी सांगितले. तरीही आम्ही काँग्रेस सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.