Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

Goa Zilla Panchayat Election 2025: शिरोडा मतदारसंघातील बोरी आणि शिरोडा या दोन्हीही जिल्हा पंचायती महिलांकरिता आरक्षित केल्यामुळे येथे आगामी निवडणुकीत महिलाराज येण्याचे निश्चित झाले आहे.
Goa Zilla Panchayat Election
ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

फोंडा: शिरोडा मतदारसंघातील बोरी आणि शिरोडा या दोन्हीही जिल्हा पंचायती महिलांकरिता आरक्षित केल्यामुळे येथे आगामी निवडणुकीत महिलाराज येण्याचे निश्चित झाले आहे.

बोरी आणि बेतोडा - निरंकाल या दोन पंचायतींचा समावेश बोरी जि.पं.मध्ये करण्यात आला असून शिरोडा व पंचवाडी या दोन पंचायतींचा समावेश शिरोडा जि.पं.मध्ये करण्यात आला आहे. दीपक नाईक बोरकर हे बोरीचे विद्यमान सदस्य असून नारायण कामत हे शिरोड्याचे सदस्य आहेत. आता हे दोन्ही मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे या दोन्हीही विद्यमान सदस्यांचा पत्ता कट होणार, हे निश्‍चित.

Goa Zilla Panchayat Election
Goa Zilla Panchayat Election: जिल्‍हा पंचायत निवडणुकीत 80% नव्‍या चेहऱ्यांना संधी! दामू नाईक यांची माहिती; Watch Video

भाजपने आपले पत्ते अद्याप उघडले नसले तरी उमेदवार निवडीवर मंत्री तथा शिरोडा मतदारसंघाचे आमदार सुभाष शिरोडकर यांचे वर्चस्व असणार, हे निश्चित आहे. बोरीचे सदस्य दीपक बोरकर हे भाजपचे जुने कार्यकर्ते असल्यामुळे याहीवेळी त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची दाट शक्यता होती. तसे झाले असते तर विजयाची हॅटट्रिक करण्याची त्यांना चांगली संधी होती. पण आता आरक्षणामुळे त्यांची संधी हुकली आहे. तीच गोष्ट नारायण कामत यांची. कामत हे सुभाषभाऊंचे निकटवर्ती म्हणून गणले जातात.

पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी असलेले कामत हे सुभाषभाऊंसोबत भाजपमध्ये (BJP) आले होते. त्यांनाही हॅटट्रिक करण्याची संधी होती. आता त्यांच्या जागी भाजप कोणाला उमेदवारी देतो, हे पहावे लागेल. दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या आघाडीवर सामसूम दिसत असून गोवा फॉरवर्डने मात्र शिरोडा मतदारसंघातून काजल गावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Goa Zilla Panchayat Election
Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायतीसाठी 'बॅलेट पेपर'चा वापर, पाच कोटींचा होणार खर्च; मतदारयादीत नवी नावे जोडणे स्थगित

आता काँग्रेस गावकर यांना पाठिंबा देतात, का स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवितात, हे पहावे लागेल. बोरी मतदारसंघाबाबत मात्र गोवा फॉरवर्ड, काँग्रेस यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. आरजीबाबतही तेच म्हणता येईल. वास्तविक गेल्या विधानसभा निवडणुकीत शिरोडा मतदारसंघातून आरजीचे शैलेश नाईक यांना ५०६३ मते प्राप्त झाली होती. हे पाहता या निवडणुकीतही आरजी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे दिसते. गोवा फॉरवर्ड, काँग्रेस व आरजी यांची युती होणार की काय, हेही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे विरोधी पक्षाबाबत सध्या गोंधळाचे वातावरण असून त्याचा फायदा भाजप उठवू शकतो की काय, हे बघावे लागेल.

Goa Zilla Panchayat Election
Zilla Panchayat Election: गोवा फॉरवर्ड, ‘आप’कडून जोर, काँग्रेस स्‍वस्‍थच! जिल्‍हा पंचायत निवडणूक; सरदेसाईंकडून उमेदवार चाचपणी

सुभाषभाऊंसाठी ‘लिटमस टेस्ट’

ही निवडणूक (Election) म्हणजे शिरोडा मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याकरता ही ‘लिटमस टेस्ट’ ठरणार आहे. सध्या दोन्हीही जि. पं. मतदारसंघ भाजपकडे असल्यामुळे या निवडणुकीत याची पुनरावृत्ती करण्याची जबाबदारी सुभाषभाऊंवर असेल. विधानसभा निवडणुकीला आता फक्त एक वर्षाचा अवधी असल्यामुळे निवडणुकीची तयारी म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम ठरू शकते. त्यादृष्टीनेही सुभाषभाऊंना प्रयत्न करावे लागणार आहेत. आता यात सुभाषभाऊ किती यशस्वी होतात, याचे उत्तर मिळण्याकरता निकालाची वाट पाहावी लागेल, हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com