काव्या मारनचा 'तो' निर्णय अंगलट! पाकिस्तानी खेळाडूची खरेदी अन् सनरायझर्स टीमचं ट्विटर खातचं सस्पेंड; भारतीय चाहत्यांकडून संताप

Sunrisers Leeds Twitter Account Suspended: इंग्लंडमधील लोकप्रिय क्रिकेट लीग 'द हंड्रेड'च्या लिलावामुळे सध्या भारतीय क्रिकेट विश्वात एक मोठे वादळ उठले आहे.
Sunrisers Leeds Twitter Account Suspended
Kavya MaranDainik Gomantak
Published on
Updated on

Sunrisers Leeds Controversy: इंग्लंडमधील लोकप्रिय क्रिकेट लीग 'द हंड्रेड'च्या लिलावामुळे सध्या भारतीय क्रिकेट विश्वात एक मोठे वादळ उठले आहे. सनरायझर्स फ्रँचायझीची टीम असलेल्या 'सनरायझर्स लीड्स'ने पाकिस्तानी क्रिकेटपटू अबरार अहमदला मोठ्या किमतीत खरेदी केल्यानंतर भारतातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, 'एक्स' ने सनरायझर्स लीड्सचे अधिकृत खाते निलंबित केले.

जरी 'एक्स'ने यामागील स्पष्ट कारण दिलेले नसले, तरी नियमांचे उल्लंघन किंवा वाढता वाद हे त्यामागील मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे. अबरार अहमद हा भारतीय मालकीच्या कोणत्याही फ्रँचायझीने खरेदी केलेला पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला. त्याला 2.55 लाख अमेरिकन डॉलर्स (सुमारे 2.3 कोटी भारतीय रुपये) देऊन ताफ्यात सामील करण्यात आले, पण हाच निर्णय आता फ्रँचायझीच्या अंगलट येताना दिसत आहे.

Sunrisers Leeds Twitter Account Suspended
IPL 2026 Schedule: आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल! 26 मार्च नव्हे तर 'या' तारखेपासून रंगणार क्रिकेटचा थरार

या वादाचे मूळ केवळ खेळाडूच्या राष्ट्रीयत्वात नसून त्याच्या भूतकाळातील वादग्रस्त वर्तनात आहे. सोशल मीडियावरील (Social Media) दाव्यांनुसार, 2025 मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता, तेव्हा अबरारने भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या काही पोस्ट शेअर केल्या होत्या. भारतीय सुरक्षा दलांची थट्टा उडवणाऱ्या खेळाडूवर भारतीय मालकीच्या संघाने कोट्यवधींची उधळण करणे, ही देशभावनांशी प्रतारणा असल्याची भावना क्रीडाप्रेमींमध्ये आहे. परिणामी, सोशल मीडियावर #ShameOnSRH आणि #BoycottSunrisers यांसारखे हॅशटॅग वेगाने ट्रेंड होऊ लागले. सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन हीलाही नेटकऱ्यांनी टार्गेट केले असून राष्ट्रीय भावनांपेक्षा पैसा महत्त्वाचा वाटतो का, असा बोचरा सवाल तिला विचारला जात आहे.

Sunrisers Leeds Twitter Account Suspended
Gautam Gambhir IPL Offer: सीईओ, मेंटॉर अन् पार्टनर... गौतम गंभीर टीम इंडियाचं हेड कोच पद सोडणार? 'या' IPL टीमकडून मोठी ऑफर!

फ्रँचायझीच्या अंतर्गत गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, संघ निवडीचा निर्णय पूर्णपणे कामगिरीवर आधारित होता. संघाचे प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांनी स्पष्ट केले की, ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सकारात्मक अभिप्रायानंतरच अबरारला संघात घेण्याचा निर्णय झाला. पाकिस्तानी खेळाडूंना घेण्याबाबत कोणतीही विशेष बैठक झाली नव्हती, तर केवळ मैदानावरील गरजेनुसार ट्रेंट रॉकेट्सशी लिलावात चढाओढ करुन अबरारला मिळवले गेले. 'द हंड्रेड'मध्ये अबरार व्यतिरिक्त उस्मान तारिक या दुसऱ्या पाकिस्तानी खेळाडूला बर्मिंगहॅम फोनिक्सने खरेदी केले आहे. मात्र, सनरायझर्स ही भारतीय ब्रँड असल्याने त्यांच्यावरील टीकेची धार अधिक तीव्र आहे.

Sunrisers Leeds Twitter Account Suspended
IPL Banned: क्रिकेट चाहत्यांना धक्का! 'या' दोन देशात 'आयपीएल'वर बंदी; मुस्तफिजुरची हकालपट्टी शेजारील देशांना झोंबली

सध्या सुरु असलेला हा वाद पाहता सनरायझर्स लीड्सला अबरार अहमदचा करार रद्द करण्यासाठी भाग पाडले जाण्याची दाट शक्यता आहे. क्रिकेट वर्तुळात जानेवारी 2026 मधील मुस्तफिजुर रहमान आणि कोलकाता नाईट रायडर्स प्रकरणाचे उदाहरण दिले जात आहे. बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयच्या (BCCI) निर्देशानुसार केकेआरला 9.2 कोटींचा करार मोडावा लागला होता. जरी सनरायझर्स लीड्स ही टीम इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाच्या अखत्यारीत येत असली, तरी व्यावसायिक हितसंबंध आणि भारतातील वाढता राजकीय व सामाजिक दबाव पाहता अबरार अहमदला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, अशी चिन्हे दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com