Court  Dainik Gomantak
गोवा

Danielle McLaughlin Murder Trial: डॅनियली खून प्रकरणात ४ नोव्‍हेंबर ठरणार महत्त्‍वपूर्ण दिवस, जाणून घ्या कोर्टात काय घडणार?

Danielle McLaughlin Murder Case: डॅनियली मॅक्‍लॉग्‍लीन बलात्‍कार व खून प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. संशयित विकट भगत याला पुढच्‍या आठवड्यात त्‍याच्‍याविरोधात न्‍यायालयासमोर झालेल्‍या साक्षीपुराव्‍यांची माहिती करून देण्‍यात येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Danielle McLaughlin Murder Trial Latest Update

मडगाव: गोव्‍यात पर्यटक म्‍हणू्न आलेल्‍या डॅनियली मॅक्‍लॉग्‍लीन बलात्‍कार व खून प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. संशयित विकट भगत याला पुढच्‍या आठवड्यात त्‍याच्‍याविरोधात न्‍यायालयासमोर झालेल्‍या साक्षीपुराव्‍यांची माहिती करून देण्‍यात येणार आहे. या खटल्‍याच्‍या निकालाकडे गोव्‍यातील लोकांचेच नव्‍हे तर ब्रिटन व आयर्लंड या राष्‍ट्रांतील लोकांचेही लक्ष लागून राहिले आहे.

सहा वर्षांपूर्वी हे प्रकरण गोव्‍यातच नव्‍हे तर संपूर्ण जगात गाजले होते. दक्षिण गोव्‍याच्‍या अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश क्षमा जोशी यांच्‍यासमोर सुरू असलेली सुनावणी आता पूर्ण झाली आहे. या प्रकरणात विकट भगत या स्‍थानिक युवकाला अटक करण्‍यात आली होती.

त्‍याच्‍या कपड्यांवर आणि स्‍कूटरवर डॅनियलीच्‍या रक्‍ताचे डाग सापडले होते. त्‍यानंतर तिचे रक्‍ताळलेले कपडे विकटच्‍या घराजवळच सापडले होते. ९ जून २०१७ रोजी काणकोण पोलिसांनी संशयिताविरोधात न्‍यायालयात आरोपपत्र दाखल केले. मात्र नंतर कोरोनामुळे ही सुनावणी रेंगाळली होती. त्‍यामुळे डॅनियलीच्‍या आईने ब्रिटिश दूतावासांशी संपर्क साधून लक्ष वेधले होते.

४ नोव्‍हेंबर ठरणार महत्त्‍वपूर्ण

या सात वर्षांच्‍या काळात या खटल्‍यात अभियोग पक्षाने ६८ साक्षीदारांच्‍या साक्षी व ५८ वस्‍तू साक्षीपुरावे म्‍हणून न्‍यायालयात सादर केले. आता न्‍या. जोशी ४ नोव्‍हेंबर रोजी संशयित आरोपी भगत याला त्‍याच्‍याविरोधात आलेल्‍या साक्षीपुराव्यांची माहिती करून देणार आहेत. त्‍यानंतर अंतिम युक्तिवाद होऊन या प्रकरणी निकाल दिला जाईल. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

२०१७ मध्‍ये बलात्‍कार करून खून

आयरीश वंशाची ब्रिटिश बॅगपॅकर असलेली डॅनियली मॅक्‍लॉग्‍लीन (२४) ही २०१७ साली होळी सणादरम्‍यान गोव्‍यात आली होती. होळीचा सण साजरा करण्‍यासाठी ती देवबाग-काणकोण येथे आली असता, तिचा मृतदेह नग्‍न अवस्‍थेत एका शेतात सापडला होता. १३ मार्च २०१७ रोजी तिची निर्घृण हत्‍या करण्‍यात आली होती. हत्‍या करण्‍याच्‍या आधी तिच्‍यावर बलात्‍कार केल्‍याचे उत्तरीय तपासणीतून स्‍पष्‍ट आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT