Damodar Shirodkar  Dainik Gomantak
गोवा

Sonsodo News: सोनसडा येथील कचरा समस्‍या संपली! मडगाव नगराध्‍यक्ष शिरोडकरांचा दावा

Margao Municipal Council: मडगाव नगरपालिकेचे नगराध्‍यक्ष म्‍हणून दामोदर शिरोडकर यांनी शनिवार १२ ऑक्‍टोबर रोजी दोन वर्षे पूर्ण केली आहेत. या दोन वर्षांच्‍या कार्यकाळात सोनसड्यावरील कचरा समस्‍या जवळपास सोडविली असून अन्‍य बाबीही जागेवर घातल्‍या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: मडगाव नगरपालिकेचे नगराध्‍यक्ष म्‍हणून दामोदर शिरोडकर यांनी शनिवार १२ ऑक्‍टोबर रोजी दोन वर्षे पूर्ण केली आहेत. या दोन वर्षांच्‍या कार्यकाळात आपण सोनसड्यावरील कचरा समस्‍या जवळपास सोडविली असून अन्‍य बाबीही जागेवर घातल्‍या आहेत. आता उच्‍चाधिकार समन्‍वय समितीकडून कचऱ्यावर प्रक्रिया कशी करावी याबद्दल निर्णय होण्‍याची वाट आम्‍ही पाहात आहोत, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

आपल्‍या भविष्‍यातील योजनांची रूपरेषा सांगताना नगराध्‍यक्ष शिरोडकर म्‍हणाले की, पालिका आता महसूल गोळा करण्‍यासाठी आणि थकबाकी वसूल करण्‍यासाठी सर्वतोपरी प्रयत्‍न करेल. सोनसडा समस्‍येव्‍यतिरिक्‍त आपण दोन वर्षांत सुमारे ४५ पालिका कर्मचाऱ्यांना बऱ्याच काळापासून पडून असलेल्‍या विभागीय बढत्‍या देण्‍यात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय सुमारे २५० पालिका कर्मचाऱ्यांना एमएसीपीचा लाभ मिळवून दिल्‍याचे त्‍यांनी नजरेस आणून दिले.

सोनसडाची समस्‍या जवळपास संपली आहे. आम्‍ही बहुतेक बाबी जागेवर घातल्‍या आहेत. ओला कचरा आता काकोडा कचरा प्रक्रिया प्रकल्‍पात जात आहे. सोनसडा येथे प्रक्रिया प्रकल्‍प उभारण्‍याच्‍या प्रश्नावर मुख्‍यमंत्र्यांच्‍या अध्‍यक्षतेखालील उच्‍चाधिकार समिती निर्णय घेणार आहे, असे ते म्‍हणाले.

थकबाकीच्या वसुलीवर भर देणार

पालिका आता कर थकबाकीच्‍या वसुलीवर भर देणार आहे. आस्‍थापने आणि घरे कराच्‍या कक्षेत आणून महसूल वाढवण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यात येईल. याकरिता पालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांना माझा स्‍पष्‍ट संदेश आहे. आम्‍हाला महसूल वाढीसाठी शक्‍य आहे ते सर्व काही करायचे आहे. कारण पालिका कर्मचाऱ्यांच्‍या मासिक पगाराचे बिल सुमारे दोन कोटी रुपये होते. हे लक्षात घेऊन थकबाकीची वसुली करावी लागणार आहे, याकडे शिरोडकर यांनी लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT