Siolim Crime: मद्यधुंद सरकारी कर्मचाऱ्याला लोकांकडून चोप! युवतीचा विनयभंग, घरच्यांना मारहाण

Siolim Crime News: शिवोली येथे एका मद्यधुंद सरकारी कर्मचाऱ्याने एका २९ वर्षीय युवतीचा कथित विनयभंग तसेच पीडितेच्या घरच्यांना धमकी देत, मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित कारचालक लक्ष्मीकांत हडफडकर याला (रा. कुचेली) याला अटक केली.

Goa Shivoli Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: शिवोली येथे एका मद्यधुंद सरकारी कर्मचाऱ्याने एका २९ वर्षीय युवतीचा कथित विनयभंग तसेच पीडितेच्या घरच्यांना धमकी देत, मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित कारचालक लक्ष्मीकांत हडफडकर याला (रा. कुचेली) याला अटक केली. यावेळी संशयिताने घटनास्थळी मोठा गोंधळ घातला होता. दरम्यान, संशयितास सोमवारी स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना रविवार, १३ रोजी घडली. यावेळी संशयित कारचालक हा मद्यधुंद स्थितीत कार (जीए-०३-पी-५७०९) ने म्हापशाहून कुचेलीच्या दिशेने जात असता त्याने वाटेत पीडितेला अश्लील भाषेत विचारणा केली. पीडिता तिथे रस-ऑम्लेट गाडा चालवते. ती कचरा फेकण्यास गेली असता हा प्रकार घडला.

Siolim Crime News: शिवोली येथे एका मद्यधुंद सरकारी कर्मचाऱ्याने एका २९ वर्षीय युवतीचा कथित विनयभंग तसेच पीडितेच्या घरच्यांना धमकी देत, मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित कारचालक लक्ष्मीकांत हडफडकर याला (रा. कुचेली) याला अटक केली.
Candolim Crime: गोव्यात चाललंय काय? कांदोळी बीचवर काढली छेड, जाब विचारताच महिलेला बेदम मारहाण; परप्रांतीयांना अटक

आई,भावाला मारहाण

आई व भाऊ संशयितास जाब विचारण्यास आले असता, संशयिताने आधी आईला (५२) व नंतर भावाला(३१) मारहाण करून धमकी दिली. हा प्रकार लोकांनी पाहिला असता, लोकांनी संशयितास चोप दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com