Sonali Phogat  Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat Murder Case मध्ये मोठा खुलासा, पीए संगवानने दिली गुन्ह्याची कबुली

Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगट खून प्रकरणाशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे.

दैनिक गोमन्तक

Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगट खून प्रकरणाशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. सोनाली फोगट यांच्या मृत्यूचा कट रचल्याची कबुली आरोपी सुधीर संगवानने दिल्याची माहिती गोवा पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. कोठडीत चौकशीदरम्यान सोनाली फोगट यांना गुरगावहून गोव्यात आणण्याचा कट रचल्याची कबुली सुधीरने दिल्याचा दावा गोवा पोलिसांच्या सूत्रांनी केला आहे. गोव्यात शूटिंगचा कोणताही प्लान नव्हता, गोव्यात आणण्याचा हा कट होता, असे पोलिसांनी सांगितले.

गोवा पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली फोगट (Sonali Phogat) यांच्या हत्येचा कट फार पूर्वीपासून रचला गेला होता. दरम्यान, या प्रकरणी लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दुसरीकडे, गोवा पोलिसांनी (Goa Police) पुष्टी केली आहे की, सर्व संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सुधीरला खून प्रकरणात दोषी ठरविण्यासाठी ही कागदपत्रे पुरेशी आहेत.

गोवा पोलीस आज संगवानच्या घरी भेट देऊ शकतात

त्याचबरोबर, गोवा पोलीस आज आरोपी सुधीर संगवानच्या रोहतक येथील घरीही भेट देऊ शकतात असे वृत्त आहे. यादरम्यान सुधीर संगवानच्या कुटुंबीयांची चौकशी केली जाऊ शकते. याशिवाय सुधीरच्या घराचीही झडती घेतली जाईल. सोनाली फोगट यांचे बंधू वतन ढाका आणि रिंकू ढाका यांनी सांगितले की, आमचे गोवा पोलिसांशी बोलणे झाले असून त्यांनी आज रोहतक येथील सुधीर संगवानच्या घरी चौकशीसाठी जाणार असल्याची माहिती दिली. सध्या गोवा पोलीस हिसारमध्ये आहेत. सुधीर संगवानच्या घरी जाऊन गोवा पोलीस आज आणखी काही लोकांचे जबाब नोंदवू शकतात. सध्या गोवा पोलीस लाल डायरीचा तपास करत आहेत.

सोनाली फोगट यांचा संशयास्पद मृत्यू

23 ऑगस्ट रोजी गोव्यात सोनाली फोगट यांचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, सोनाली यांच्या शरीरावर जखमेच्या खुणाही आढळून आल्या आहेत. या प्रकरणी सोनाली फोगट यांचा पीए सुधीर संगवान (PA Sudhir Sangwan) आणि त्याचा साथीदार सुखविंदर यांना अटक करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी नंतर कुर्लीज रेस्टॉरंटचा मालक एडविन न्युन्स आणि दोन ड्रग्ज तस्करांनाही अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT