सोनाली फोगट खून प्रकरणात गोवा पोलिस हरियाणाला रवाना

हरियाणाचे मुख्यमंत्री अन् डीजीपी यांना गोवा पोलीसांनी दिली माहिती
Sonali Phogat Death
Sonali Phogat Death Dainik Gomantak

गेल्या काही दिवसांपासून गोव्यात चर्चेत असलेल्या सोनाली फोगट खून प्रकरणातील मुख्य संशयितांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. आतापर्यंत या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारले असता गोवा पोलिस हरियाणाला रवाना झाले आहेत. अशी माहिती त्यांनी दिली.

(Sonali Phogat murder goa police left for Haryana)

Sonali Phogat Death
Goa Update: राज्यात कोरोनाचे 150 नवे रुग्ण; बळींची संख्या मात्र शून्यावर

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकारने या प्रकरणातील संपूर्ण माहिती हरियाणाचे मुख्यमंत्री आणि डीजीपी यांना दिली आहे. तसेच गुन्ह्यात समावेश असलेल्या सर्व गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. असं ही ते यावेळी म्हणाले.

Sonali Phogat Death
Land Grabbing Case: दोषींवर कारवाई करणारच - मुख्यमंत्री

पोलिसांकडून गुन्हेगारांची धरपकड सुरुच

या गुन्ह्यात ज्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. अशा गुन्हेगारांची धरपकड पोलिसांनी सुरुच ठेवली आहे. गुन्ह्याशी निगडित कर्लिसचा मालक तसेच पेडलर रामदास मांद्रेकर व दत्तप्रसाद गावकर यांच्यानंतर आणखी कोण यात सहभागी आहे. याचा तपास पोलीस करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com