Tisk Usgao Father-Son Murder-Suicide Canva
गोवा

Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

Tisk Usgao Crime News: तिस्क-उसगाव येथे एका घरात पिता आणि पुत्राचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. मूळ चंदगड (महाराष्ट्र) येथील हे कुटुंब येथे छोटेसे घर बांधून राहात होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Tisk Usgao Shaken by Father-Son Murder-Suicide

फोंडा: तिस्क-उसगाव येथे एका घरात पिता आणि पुत्राचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. मूळ चंदगड (महाराष्ट्र) येथील हे कुटुंब येथे छोटेसे घर बांधून राहात होते. पिता खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात, तर पुत्र घराच्या वाशाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याने हा खून आणि नंतर आत्महत्या असा प्रकार घडल्याचा कयास व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेत बळीराम तातोबा चंदगडकर (वय ६५ वर्षे) हे रक्ताच्या थारोळ्यात सापडले असून त्यांचा मुलगा प्रमोद बळीराम चंदगडकर हा गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याने मुलगा प्रमोद याने वडील बळीराम यांच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करून नंतर स्वतः आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

उसगाव-गांजेचे सरपंच रामनाथ डांगी व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. फोंडा पोलिसांनी पंचनामा केला. यावेळी ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले. नेमके काय घडले, याचा प्रत्यक्षदर्शी पुरावे नसल्याने तेथील परिस्थितीनुसार मुलाने पित्यावर आधी हल्ला करून नंतर स्वतःला संपविले, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इस्पितळात पाठविले असून फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दोघांत उडायचे खटके

उपलब्ध माहितीनुसार, वडील बळीराम आणि मुलगा प्रमोद हे दोघे या घरात राहात होते. बळीराम हे तिस्क - उसगाव येथील एका दुकानात मजूर म्हणून काम करीत होते, तर प्रमोद हा मिळेल ते काम करायचा. त्या दोघांत अधूनमधून खटके उडायचे; पण परिणाम इथपर्यंत पोचेल, याचा अंदाज नव्हता.

नेमके काय घडले?

बळीराम यांची एक मुलगी फोंड्याला राहते. तिला तुळशी विवाहासाठी बळीराम यांनी बोलावले होते.

आज मुलगी वडिलांच्या घरी आली असता, तिला दरवाजा उघडा दिसला.

तिने आत जाऊन पाहिले असता वडील बळीराम यांच्या अंगावर अनेक वार झालेले आणि रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले आढळले.

बाजूलाच भाऊ प्रमोद गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याने ती घाबरली. तिने आक्रोश केल्यामुळे इतरांना या घटनेची माहिती मिळाली.

बळीराम यांची मुलगी जर आज घरी आली नसती तर हे प्रकरण लवकर उघडकीस आले नसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: शुक्रवारचा दिवस ठरणार लाभदायक! 4 राशींना मिळणार यशाची नवी दिशा; कुटुंब, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदलांचे संकेत

Goa Drugs Case: काणकोणमध्ये अंमली पदार्थांवर कारवाई; 26.9 ग्रॅम चरससह हॉटेलच्या वेटरला अटक

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

SCROLL FOR NEXT