Goa Crime: दोन आठवडे झाले तरी 'आकाश' फरारीच! प्रथमेश गावडे मृत्यूप्रकरण; लुकआऊट नोटिशीसाठी हालचाली

Constable Prathamesh Gawade Death Case: पोलिस कॉन्स्टेबल प्रथमेश गावडे याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी क्राईम ब्रँचने गुन्हा नोंद केलेल्या प्रकरणातील संशयित आकाश चव्हाण दोन आठवडे होत आले तरी अजूनही फरारी आहे.
Goa Latest Crime News, Constable Prathamesh Gawade Death Case
Constable Prathamesh Gawade Death CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Constable Prathamesh Gawade Death Case Manhunt Continues for Third Suspect

पणजी: पोलिस कॉन्स्टेबल प्रथमेश गावडे याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी क्राईम ब्रँचने गुन्हा नोंद केलेल्या प्रकरणातील संशयित आकाश चव्हाण दोन आठवडे होत आले तरी अजूनही फरारी आहे. याप्रकरणातील दोन महिला पोलिस कॉन्स्टेबल्स प्रीती व तनिष्का चव्हाण सध्या जामिनावर आहेत. संशयित आकाश हा तनिष्का हिचा भाऊ असून त्याचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

वास्को रेल्वे पोलिस स्थानकात कामाला असलेल्या प्रथमेश गावडे याचे संशयित महिला कॉन्स्टेबल प्रीती चव्हाण हिच्याशी प्रेमसंबंध होते. काहीवेळा तो संशयित प्रीतीला धमक्या तसेच मारहाण करत असे. त्यामुळे तिने त्याच्याशी संबंध तोडले होते. त्यानंतरही तो तिची सतावणूक करत होता. तिला तिची चुलत बहीण तनिष्का व संशयित आकाश मदत करत असल्याने प्रथमेशने त्याच्याशीही वाद घातला होता.

याप्रकरणी पोलिस मृत प्रथमेशच्या कुटुंबीयांशीही चौकशी करून तपास करत आहेत. संशयितांनी सतावणूक व धमक्या दिल्याचा आरोप प्रथमेशने आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओत केला होता. त्यासंदर्भात पुरावे जमा करण्यात येत आहेत. त्याच्या तसेच महिला कॉन्स्टेबल्सची ‘सीडीआर’ मिळवून तपास सुरू आहे. संशयित आकाश चव्हाणला अटक केल्यानंतरच यामागील कारणे पुढे येऊ शकतात.

Goa Latest Crime News, Constable Prathamesh Gawade Death Case
Goa Crime: भूमिगत वीज केबल चोरणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या! तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

लुकआऊट नोटिशीसाठी हालचाली

प्राप्त माहितीनुसार संशयित आकाश चव्हाण अजूनही पोलिसांसमोर चौकशीस समोर येत नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. सध्या जामिनावर असलेल्या निलंबित संशयित महिला पोलिस कॉन्स्टेबल्सच्या हालचालींवरही नजर ठेवण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com