Som Yag Yadnya 2023 Dainik Gomantak
गोवा

Som Yag Yadnya 2023: समाज, राज्य, राष्ट्र यांच्या उन्नतीसाठीच सोमयाग यज्ञ उत्सव- श्रीपाद नाईक

सोमयाग उत्सवाच्या माध्यमातून जे जे काही अनिष्ट, विघ्न, संकट असेल ते नक्कीच दूर होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोमन्तक- सकाळ समूह आयोजित अग्निष्टोम महासोमयाग म्हापसात काणका येथील विश्वाटी विश्वेश्वर देवस्थानच्या परिसरात सोमयाग सुरू आहे. विश्वकल्याणार्थ आयोजित या महासोमयागाला रविवारपासून प्रारंभ झाला आहे. आज यज्ञाच्या चौथ्या दिवशी देखील विविध विधी पार पडले. यात प्रामुख्याने 'वेदीकरण' आणि 'प्रवर्ग्य' असे दोन विधी पार पडले.

या महासोमयागाला केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक आज भेट दिली. यावेळी त्यांनी महासोमयाग आयोजनाबद्दल गोमन्तक- सकाळ समूहाला शुभेच्छा दिल्या. "सकाळ गोमंतकने आयोजित केलेल्या सोमयाग यज्ञ उत्सवाला येण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. यज्ञ हीच आमची संस्कृती असून सोमयागासारखे यज्ञ उत्सव हे कुणा एकाच्या हितासाठी नसून समाज, राज्य, राष्ट्र यांची उन्नती व्हावी हाच शुद्ध हेतू मनात ठेऊन ही कार्य आरंभली जातात.

सोमयाग यज्ञ उत्सव करून आपल्या संस्कृतीचे पालन आणि जपणूक करण्याचे काम सकाळ, गोमंतक करत आहे. सोमयाग उत्सवाच्या माध्यमातून जे जे काही अनिष्ट, विघ्न, संकट असेल ते नक्कीच दूर होणार आहे. प्रत्येक माणसाच्या मनात सत्याची, धर्माची भावना जागृत होणार आहे. ही परंपरा अशीच पुढे चालत राहावी अशी विनंती मी ईश्वरचरणी करतो" अशी प्रतिक्रिया श्रीपाद नाईक यांनी दिली.

तसेच वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही काल सोमयाग यज्ञ उत्सवाला उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना ते म्हणाले, सोमयाग उत्सवाला सहभागी होता आलं याचा मला खूप आनंद आहे. गोव्यात नवचंडी, शतचंडी यासारखे उत्सव साजरे होतात. मात्र सोमयाग हा क्वचितच केला जातो. सर्वांनी या उत्सवात सक्रिय सभागी व्हावे आणि याचा आनंद घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT